शिवप्रहार न्युज - शरद पवारांची 'राजकीय खुन्नस' आता लंकेंचाही 'राजकीय बळी' देणार का?
शरद पवारांची 'राजकीय खुन्नस' आता लंकेंचाही 'राजकीय बळी' देणार का?
नगर (शिवप्रहार न्यूज)- राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते शरद पवार हे आता जुन्या 'राजकीय खुन्नस' पायी आ.निलेश लंकेचा 'राजकीय बळी' देणार का ? असा सवाल दक्षिणेतील जाणकार राजकारणी नगरकरांनी उपस्थित केला आहे. शरद पवार व स्व.लोकनेते पद्मभुषण मा.खा. बाळासाहेब विखे पाटील यांची 'राजकीय खुन्नस' नगर जिल्ह्याने नव्हे तर महाराष्ट्र व देशाने गडाख - विखे निवडणुक खटल्याच्या माध्यमातून पाहिली. आता गेल्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत डॉ.सुजय विखे यांनी उमेदवारी केली तेव्हा शरद पवारांनी आ.संग्राम जगताप यांना उमेदवारी दिली तरीपण सुजयदादा लोकांच्या मतदानरूपी आशिर्वादाने खासदार झाले. आता पंतप्रधान नरेंन्द्र मोदी व केंन्द्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी खा.सुजय विखे.पा यांना पुन्हा भाजपची उमेदवारी दिली. राज्याचे महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे चांगले राजकीय संबंध आहेत. आ.संग्राम जगताप अजितदादांबरोबर आहेत तर आ.अरुणकाका जगताप यांनी स्व.बाळासाहेब विखे पाटील यांच्या प्रचाराची धुरा त्यावेळी भक्कम पणे सांभाळली होती. विधानपारिषद निवडणुकीत मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी त्यांना साथ दिली होती. आता तर दक्षिणेतील विखे कुटुंबाला मानणारा लाखो मतदार तसेच आ.अरुणकाका जगताप, आ.संग्रामभैय्या जगताप, माजीमंत्री शिवाजी कर्डीले यांची या लोकसभा निवडणुकीत खा.डॉ. सुजयदादा विखे यांना भक्कम साथ लाभणार आहे. अशावेळी जेष्ठ नेते शरद पवार यांनी जुनी राजकीय खुन्नस कायम ठेवण्याचे दृष्टिने आ.निलेश लंकेचा 'राजकीय बळी' देण्याच्या तयारीत आहेत. उपमुख्यमंत्री आजितदादा पवार यांनी तर मागच्या आठवड्यात लंकेच्या डोक्यात हवा भरली अशा शेलक्या शब्दांत लंकेना इशारा दिला. देशात मोदी सरकार येणार असे सर्व एक्झीट पोल आचारसंहिता लागण्यापूर्वी प्रसारमाध्यमांनी जाहीर केले होते. तेव्हा नगरी राजकारणी म्हणतात की, खा.शरद पवार यांनी मागच्या लोकसभेला मंत्री विखेंचे भाऊ डॉ.अशोक विखे पा. यांना गांधी मैदानात सभेला आणले होते तेही खा.सुजय विखेंच्या विरोधात पण त्याचाही उपयोग झाला नव्हता.
दरम्यान 2019 च्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेली असलेल्या नगर दक्षिण लोकसभेच्या उमेदवारीसाठी डॉ.सुजय विखे मागणी करत असताना शरद पवार यांनी "माझ्या मुलांचा हट्ट मी पुरवेन, दुसऱ्यांच्या मुलांचा नाही" असे वक्तव्य केले होते परंतु आता आ.रोहित पवार जिल्ह्यातीलच आमदार असल्याने खासदार सुजय विखे यांच्या विरोधात त्यांना उमेदवारी देऊन शरद पवार 'राजकीय खुन्नस' का काढत नाही अशा भावना नगरी राजकारण्यांनी आठवणी सांगत व्यक्त केल्या.