शिवप्रहार न्युज - मी हिंदु मुलीशीच विवाह करील म्हणत शेख घरात घुसला! विनयभंग खळबळ !!

शिवप्रहार न्युज - मी हिंदु मुलीशीच विवाह करील म्हणत शेख घरात घुसला! विनयभंग खळबळ !!

मी हिंदु मुलीशीच विवाह करील म्हणत शेख घरात घुसला! विनयभंग खळबळ !!

   नगर (शिवप्रहार न्यूज)- काल नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली असून एका 14 वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून शेख नावाच्या तरुणाने मी हिंदूच्या मुलीशीच विवाह कारणार असे म्हणून मी तुझ्याशीच लग्न करेल तू जर तयार नसेल तर तुला पळून घेऊन जाईल ! तुम्ही ..... माझे काय करणार असे धमकावून हात धरून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. मुलीच्या वडिलांना शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. भर दुपारी चार वाजता हा प्रकार घडला.

      या घटनेने श्रीगोंदा तालुक्यात खळबळ उडाली असून पीडित मुलीने फिर्याद दिल्यावरून आरोपी शेख व इतर दोन अशा तिघांविरुद्ध भादंवि कलम 354,504,506, 34 बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण पोस्को कायदा कलम 8 ,12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गोरड हे पुढील तपास करीत आहे.एका आरोपीला ताब्यात घेतल्याचे समजते.