शिवप्रहार न्युज - विद्यार्थीनीवर श्रीरामपुरात कॅफेत तर शिर्डीत हॉटेलमध्ये बलात्कार...

शिवप्रहार न्युज - विद्यार्थीनीवर श्रीरामपुरात कॅफेत तर शिर्डीत हॉटेलमध्ये बलात्कार...

विद्यार्थीनीवर श्रीरामपुरात कॅफेत तर शिर्डीत हॉटेलमध्ये बलात्कार...

   श्रीरामपूर / शिर्डी (शिवप्रहार न्युज)- श्रीरामपूर शहरातील बसस्थानकासमोर असलेल्या पिझा हट कॅफे येथे एका १७ वर्ष वयाच्या तरुणीवर दोघा आरोपींनी आळीपाळीने लैंगीक अत्याचार करत बलात्कार केला.तर याच विद्यार्थीनीवर शिर्डीतील साई मलीक हॉटेलमध्ये एका आरोपीने बळजबरीने बलात्कार केला. अल्पवयीन विद्यार्थीनीवर सामुहीक बलात्कार केला म्हणून पिडीत मुलीच्या फिर्यादीवरुन आरोपी ललीत - रा शिरसगांव, आरोपी - अनिकेत व महेश, दोघे राहणार- माळेवाडी या तिघांविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलिसात भादवि कलम ३७६, ३७६ (ड), ३५४, ३२३, ५०४, ५०६ व बालकांचे लैगीक अत्याचारापासून संरक्षण पोस्को कायदा कलम ४, ८, १२ प्रमाणे गुन्हा दाखवल करण्यात आला आहे.

         श्रीरामपूर डीवायएसपी डॉ.बसवराज शिवपुजे, पोनि. नितीन देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली. सपोनि.आव्हाड हे पुढील तपास करीत आहेत. अल्पवयीन मुलीच्या अज्ञानपणाचा गैरफायदा उठवत आरोपींनी सामुहीक बलात्कार करून विनयभंग केला व पिडीतेला धमकी दिली.त्यामुळे पालक वर्गात एकच खळबळ उडाली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.