शिवप्रहार न्युज - कोर्टात तारखेसाठी जाणाऱ्या नवरा- बायकोवर श्रीरामपुरात कोयत्याने हल्ला…
कोर्टात तारखेसाठी जाणाऱ्या नवरा- बायकोवर श्रीरामपुरात कोयत्याने हल्ला…
श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- कोर्टाची तारीख असल्याने कोर्टामध्ये चाललेल्या जोडप्यावर हल्ला केल्याचा प्रकार बुधवारी सकाळी ११ वाजता नेवासारोडवरील रेल्वे बोगद्याजवळ घडला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी सकाळी ११ वा. सरस्वती कॉलनी येथे राहणारे तुकाराम डोखे हे आपली पत्नी सुनिता यांच्यासह केसची तारीख असल्याने कोर्टामध्ये दुचाकीवर जात असताना नेवासा रोडवरील रेल्वे बोगद्याजवळ आले असता मोटारसायकलवर आलेल्या दोघांनी अचानकपणे डोखे या दाम्पत्यावर हल्ला केला. या हल्लेखोरांनी तुकाराम डोखे यांच्या हातावर कोयत्याने वार केले असून सौ. डोखे यांना मारहाण करून हल्लेखोर तेथून पळून गेले. त्यानंतर श्री व सौ डोखे यांना उपचारासाठी साखर कामगार रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
सदर हल्ला कोर्टातील केसच्या कारणावरून घडला की आणखी कोणत्या कारणाने ? हे समजू शकले नाही.