शिवप्रहार न्युज - “शिवछत्रपती सन्मान कायद्यासाठी” उद्या नगर जिल्ह्यात ०४ ठिकाणी रास्ता रोको…

शिवप्रहार न्युज - “शिवछत्रपती सन्मान कायद्यासाठी” उद्या नगर जिल्ह्यात ०४ ठिकाणी रास्ता रोको…

“शिवछत्रपती सन्मान कायद्यासाठी” उद्या नगर जिल्ह्यात ०४ ठिकाणी रास्ता रोको…

नगर- शिवछत्रपतींच्या सन्मानासाठी कठोर शिक्षा असलेला कायदा सरकारने करावा जेणेकरुन कोणी महाराजांचा अवमान करण्यास धजावणार नाही म्हणुन या मुख्य मागणीकरता उद्या दि.२८ जून २०२४ रोजी सकाळी ११ वा.नगर जिल्ह्यात चार ठिकाणी शिवभक्त व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

        काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये पठाण नावाच्या एका माथेफिरूने शिवछत्रपतींच्या स्मारकाची विटंबना केली.त्यामुळे जनक्षोभ निर्माण झाला आहे. तसेच याआधीही अनेक शिवद्रोही लोक आणि इतरही काही समाजविघातक प्रवृत्तींकडून शिवछत्रपतींचा वारंवार अपमान केला जात आहे.त्यामध्ये नगरचा हिजडा श्रीपाद छिंदम ,महाराष्ट्राचा तत्कालीन धोतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी,जितेद्र आव्हाड इत्यादी समाजविघातक प्रवृत्तींचा समावेश आहे.

        तरी कोणी शिवछत्रपतींचा अपमान केल्यास अति अति कठोर शिक्षा व्हावी असा कायदा करावा ह्या मुख्य मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.जेथे हे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार ते चार ठिकाण खालीलप्रामाणे = 

नगर शहरातील कायनेटिक चौक 

नेवासा फाट्यावरील राजमुद्रा चौक 

बाभळेश्वर गावातील चौक

संगमनेरमधील घुलेवाडी फाटा 

        तरी थेट आपले दैवत युगप्रवर्तक, युगपुरुष, छत्रपती शिवाजी महाराजांच्या संबंधित हे कार्य असल्याने शिवप्रहारच्या वतीने पूर्ण पाठिंबा या कार्याला दर्शवण्यात आला असून सर्वांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.महाराष्ट्रात असे आंदोलन करण्यात येणार आहे.