शिवप्रहार न्युज - नगर,संगमनेर व लोणी परिसरात चैन स्नॅचिंग करणारा सराईत आरोपी 50 ग्रॅम सोन्यासह जेरबंद...
नगर,संगमनेर व लोणी परिसरात चैन स्नॅचिंग करणारा सराईत आरोपी 50 ग्रॅम सोन्यासह जेरबंद...
नगर- नमुद बातमीची हकीगत अशी की, दिनांक 21 जुन, 2024 रोजी फिर्यादी सौ. कल्पना राजेंद्र गांगुर्डे वय 58, रा. रेणावीकर नगर, भिडे चौक, नगर या रस्त्याने पायी जात असतांना पाठीमागुन अनोळखी 2 इसम मोटार सायकलवर येवुन फिर्यादीजवळ थांबुन मोटार सायकलवर पाठीमागे बसलेल्या इसमाने फिर्यादी यांना आडवुन धक्काबुक्की करुन गळ्यातील 70,000/- रुपये किंमतीचे सोन्याचे 25 ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र ओढुन तोडून बळजबरीने चोरुन नेले बाबत. तोफखाना पो.स्टे.गु.र.नं. 741/2024 भादविक 394, 34 प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे.
चैन स्नॅचिंगची घटना घडल्यानंतर मा. श्री. राकेश ओला, पोलीस अधीक्षक, नगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन चैन स्नॅचिंग गुन्ह्यांचा समांतर तपास करुन, गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/हेमंत थोरात व अंमलदार रविंद्र कर्डीले, दत्तात्रय गव्हाणे, सचिन अडबल, गणेश भिंगारदे, देवेंद्र शेलार, संतोष खैरे, अमृत आढाव, फुरकान शेख, मेघराज कोल्हे व चंद्रकांत कुसळकर अशांचे पथक नेमुन चैन स्नॅचिंगचे गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपींकडे तपास करुन गुन्हे उघडकीस आणणे बाबत सुचना दिल्या. स्थागुशा पथक अहमदनगर शहर, संगमनेर व लोणी परिसरात झालेल्या चैन स्नॅचिंग घटना ठिकाणी भेट देवुन, सदर ठिकाणचे व आजु बाजूचे सीसीटीव्ही फुटेज संकलीत केले. व त्या आधारे तपास करुन फुटेज मधील 1 इसम हा रेकॉर्डवरील आरोपी नामे विनोद पवार रा. नाशिक असल्याचे निष्पन्न झाले. स्थागुशा पथक सदर आरोपीचा शोध घेत असतांना दिनांक 01/07/24 रोजी पोनि/श्री. दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत आरोपी विनोंद पवार, रा. नाशिक हा त्याचे साथीदारासह तारकपुर बस स्थानक नगर येथे गेट जवळ उभा असुन त्याने अंगामध्ये राखाडी रंगाचा फुल बाहीचा शर्ट व काळसर रंगाची पॅन्ट घातलेली आहे. आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने प्राप्त माहिती पथकास देवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत कळविले.
स्थागुशा पथकाने तारकपुर बस स्थानक नगर येथे जावुन पहाणी करता, तेथे बातमीतील वर्णनाप्रमाणे 1 संशयीत इसम दिसुन आला. त्यास पोलीस पथकाची ओळख सांगुन, त्याचे नाव गांव विचारता त्याने त्याचे नाव 1) विनोद गंगाराम पवार, वय 40, रा. सिडको झोपडपट्टी, भगतसिंग नगर, जिल्हा नाशिक असे सांगितले. त्यास नगर येथे येण्याचे कारणाबाबत विचारपुस करता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यास अधिक विश्वासात घेवुन विचारपुस करता त्याने त्याचा साथीदार नामे किशोर धोत्रे रा. शांतीनगर, जिल्हा नाशिक याचे सोबत मोटार सायकलवर येवुन जुन महिन्यात संगमनेर, लोणी व अहमदनगर शहरातील महिलांचे गळ्यातील मंगळसुत्र चोरी केल्याचे सांगितल्याने त्यास ताब्यात घेतले. आरोपीचा साथीदार नामे किशोर धोत्रे (फरार) नाशिक याचा शोध घेतला परंतुतो मिळुन आला नाही.
आरोपीने दिलेल्या माहितीच्या अनुषंगाने नगर जिल्हा गुन्हे अभिलेख पडताळणी करता खालील प्रमाणे चैन स्नॅचिंगचे 4 गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. तोफखाना 741/24 भादविक 394, 34
2. संगमनेर शहर 503/24 भादविक 392, 34
3. संगमनेर शहर 561/24 भादविक 392, 34
4. लोणी 366/24 भादविक 392, 34
ताब्यातील आरोपी नामे विनोद गंगाराम पवार, वय 40, रा. सिडको झोपडपट्टी, भगतसिंग नगर, जिल्हा नाशिक कडे वरील प्रमाणे दाखल चैन स्नॅचिंग गुन्ह्यातील चोरी केलेले सोन्याचे दागिन्या बाबत विचारपुस करता त्याने चोरी केलेले सोन्याचे मंगळसुत्र राहाता येथील सोनाराकडे विक्री केल्याचे सांगितल्याने सदर सोनाराचा शोध घेवुन तो मिळुन आल्याने त्याचेकडे चौकशी करता आरोपीने वडीलांचे गंभीर आजाराचे कारण सांगनु सोन्याचे दागिने माझेकडे देवुन त्या बदल्यात त्यास पैसे दिल्याचे सांगुन आरोपीने दिलेले सोने हजर केल्याने 1,06,500/- रुपये किंमतीचे 15 ग्रॅम वजनाचे सोन्याची चैन, 1,06,500/- रुपये किंमतीचे 15 ग्रॅम वजनाचे मिनीगंठण, 71,000/- रुपये किंमतीचे 10 ग्रॅम वजनाचे गंठण, 71,000/- रुपये किंमतीचे 10 ग्रॅम वजनाचे गंठण असा एकुण 3,55,000/- रुपये किंमतीचे 50 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करुन आरोपीस मुद्देमालासह तोफखाना पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन करीत आहे.
1) आरोपी नामे विनोद पवार हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द नाशिक जिल्ह्यात चैन स्नॅचिंग जबरी चोरीचे एकुण 8 गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला,पोलीस अधीक्षक, नगर, मा. श्री. प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक, नगर, व मा. श्री. वैभव कलुभर्मे, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर, मा. श्री. अमोल भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.