शिवप्रहार न्युज - श्रीरामपूर जिल्ह्याच्या आंदोलनाला रामगिरी महाराजांची आशिर्वादपर भेट...

शिवप्रहार न्युज -  श्रीरामपूर जिल्ह्याच्या आंदोलनाला रामगिरी महाराजांची आशिर्वादपर भेट...

श्रीरामपूर जिल्ह्याच्या आंदोलनाला रामगिरी महाराजांची आशिर्वादपर भेट...

   श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज) - श्रीरामपूर जिल्हा व्हावा यासाठी श्रीरामपूर जिल्हा कृती समिती व शिवप्रहार प्रतिष्ठाण यांच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलनाचा सोमवारी ४ था दिवस असून बेलापूर रोडवरील बजरंगनगर येथे सुरू असलेल्या या बेमुदत धरणे आंदोलनाला आज सोमवारी गोदाधाम (सराला बेट) चे महंत रामगिरी महाराज यांनी भेट देवून आशिर्वाद दिले. श्रीरामपूर जिल्हा झाला पाहीजे, श्रीरामपुरात छत्रपती शिवाजी - महाराज चौकात छत्रपती - शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा, स्मारक झालं पाहीजे. यासाठी हे बेमुदत धरणे आंदोलन सुरू असून आज महंत रामगिरी महाराजांसमवेत ह.भ.प.मधू महाराज, खर्डे पाटील यांच्यासह अनेक भाविकांनी या धरणे आंदोलनाला, साखळी उपोषणाला पाठींबा दिला. 

   यावेळी शिवप्रहार प्रतिष्ठाणचे माजी पोलीस अधिकारी सूरजभाई आगे यांनी महंत रामगिरी महाराज यांना श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी आजपर्यंत भव्य मोर्चा, गावोगावी बैठका तसेच मंत्रालयासमोर मुंबई येथे १७ दिवस बेमुदत उपोषण केले होते, याची माहिती देवून हा लढा जोपर्यंत श्रीरामपूर जिल्हा होत नाही तोपर्यंत श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचे प्रताप नाना भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरूच राहणार असल्याचे सूरजभाई आगे यांनी सांगितले.

   श्रीरामपूर शहरातील अनेक व्यापारी, ग्रामीण भागातील पदाधिकारी यांनी आज याठिकाणी भेट देवून साखळी उपोषणाला पाठींबा दिला. त्यात मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे, शिवसेनेचे संजय छल्लारे, रविंद्र तुपे, महावीर पाटणी, संजय कासलीवाल, ऋषीकेश सरोदे, चंद्रकांत पाटील नाईक, प्रशांत ढोकचौळे, डॉ.संजय नवथर, सतिश कुदळे, अमोल साबने, प्रा.ज्ञानेश गवले, डॉ.प्रविण आसने, किशोर सोसे, सुरेश कांगुणे, संजय साळवे, तेजस बोरावके, अजय छल्लारे, गणेश राशिनकर, चंद्रकांत पा. नाईक, गणेश चौधरी, शरदमामा नवले, गोकुळ कुताळ, बबन दाणेकर, गोरक्षनाथ खुरूद, सिताराम पवार, अमोल चितळे, अमोल बोंबले, सुधाकर बोंबले, ऋषी सरोदे, साईनाथ सरोदे, ॲड.वैभव खंडागळे, गौरव चितळे, योगेश ओझा, कुणाल करंडे, श्रीमती भारती वाणी, शितल भाऊसाहेब गोरे, भरात आसने, सुरेश पा. ताके, संदिप गवारे, दत्तात्रय लिप्टे, राजेंद्र खरात, नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथील विश्व हिंदू परिषदेचे गंगाधर रासने, गजानन गवारे, दिपक आव्हाळे, मयुर वाघमारे, सिद्धेश कापसे, मनोज काळे, बापू चाबुकस्वार आदींसह अनेकांनी भेट देवून या साखळी उपोषणाचे समर्थन केले.

   महंत रामगिरी महाराज आले तेव्हा डिवायएसपी डॉ. बसवराव शिवपुंजे व पोनि. नितीन देशमुख यांनी चोख बंदोबस्त ठेवला. प्रशासनाच्या वतीने मंडलाधिकारी मंडलीक यांनी माहिती घेवून राज्य गुप्त वार्ताचे एपीआय गवंड यांनीही या बेमुदत साखळी उपोषणाची घटनास्थळी येवून माहिती घेतली.