शिवप्रहार न्युज - विद्यार्थिनीशी गैरवर्तन करणाऱ्या  शिक्षकाला कोर्टाने दिली सक्तमजुरीची शिक्षा;शिक्षकाला सेवेतून काढले बाहेर...

शिवप्रहार न्युज -  विद्यार्थिनीशी गैरवर्तन करणाऱ्या   शिक्षकाला कोर्टाने दिली सक्तमजुरीची शिक्षा;शिक्षकाला सेवेतून काढले बाहेर...

विद्यार्थिनीशी गैरवर्तन करणाऱ्या शिक्षकाला कोर्टाने दिली सक्तमजुरीची शिक्षा;शिक्षकाला सेवेतून काढले बाहेर...

राहुरी- तालुक्यातील मदन रंगनाथ दिवे या शिक्षकाने अल्पवयीन मुली सोबत गैरवर्तन केल्याची घटना डिसेंबर 2022 मध्ये घडली होती. त्या घटनेनंतर या शिक्षकाविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.जलद गतीने सुनावणी झाल्यानंतर ह्या प्रकरणावर न्यायालयाने नुकताच निकाल दिला असून न्यायालयाच्या आदेशानुसार या शिक्षकाला ०३ वर्षाच्या सक्तमजूरीची शिक्षा झाली आहे.

       तसेच न्यायालयाने अशी शिक्षकाला शिक्षा सुनावल्यानंतर नगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांनी शिक्षकाला शिक्षक सेवेतून कायमचे हाकलून दिले आहे ;म्हणजेच बडतर्फ केले आहे.या निर्णयांमुळे लिंगपिसाट लोकांमध्ये काही प्रमाणात तरी कायद्याचा धाक निर्माण झाला आहे.