शिवप्रहार न्युज - अचानक ठरला तरी श्रीरामपूर बंद यशस्वी झाला …

शिवप्रहार न्युज -  अचानक ठरला तरी श्रीरामपूर बंद यशस्वी झाला …

अचानक ठरला तरी श्रीरामपूर बंद यशस्वी झाला …

श्रीरामपूर- काल सायंकाळी बंद पुकारून आज श्रीरामपूर शहरात दुपारपर्यंत ठेवलेला बंद यशस्वी झाला आहे. श्रीरामपूर शहरातील बेलापूररोड बजरंगनगर येथे श्रीरामपूर जिल्हा कृती समिती व शिवप्रहारच्यावतीने “शिवस्मारकासह श्रीरामपूर जिल्हा”मागणीसाठी दि.१६ ॲागस्ट २०२४ रोजीपासून सुरू असलेल्या साखळी उपोषण आंदोलनाचा आज शुक्रवारी ४३वा दिवस आहे.यानिमित्ताने मागणीला पाठिंबा देण्यासाठी व शिवभक्त,श्रीरामपूरकरांच्या तीव्र भावनांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी व्यापारी मर्चंट असोसिएशनच्या वतीने आज शुक्रवार दिनांक २७ सप्टेंबर २०२४ रोजी स्वयंस्फूर्तीने श्रीरामपूर शहरात दुपारपर्यंत बंद पुकारण्यात आला होता आहे.आज सकाळी या बंदला शहरातील व्यापारी व व्यावसायिकांनी प्रचंड प्रतिसाद देत दुपारपर्यंत श्रीरामपूर बाजारपेठ बंद ठेवली होती.

        मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या शिर्डी येथील दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हा बंद व्यापारी असोसिएशन व श्रीरामपूरकरांनी स्वयंस्फुर्तीने पाळल्यामुळे या बंदला महत्त्व प्राप्त झाले आहे.

        यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष श्री. सुनिल चंद्रप्रकाशजी गुप्ता,श्री.स्वरूपचंद कुंतीलालजी खाबिया,श्री. दत्तात्रय प्रभाकरजी धालपे,श्री. संजय शोभाचंदजी कासलीवाल,श्री. मुकेश पेमराजजी कोठारी,श्री.राहुल रमणलालजी मुथ्था,

श्री. प्रेमचंद हिरालालजी कुंकूलोळ,श्री.पुरुषोत्तम नंदलालजी झंवर,श्री. प्रविण सुभाषजी गुलाटी,श्री. राहुल रमेशजी कोठारी,श्री. निलेश सुभाषजी बोरावके,श्री. गौतम नारायणदासजी उपाध्ये,श्री. अनिल दौलतरामजी लुल्ला,श्री. निलेश जगन्नाथजी नागले,श्री.धर्मेश किर्तीकुमारजी शाह व इतर व्यापारी यांनी मेहनत घेतली.