शिवप्रहर न्युज - शिवस्मारकासह श्रीरामपूर जिल्हा आंदोलनाला पाठिंबा म्हणुन उद्या व्यापाऱ्यांचा स्वयंस्फूर्तीने “श्रीरामपूर बंद”…
शिवस्मारकासह श्रीरामपूर जिल्हा आंदोलनाला पाठिंबा म्हणुन उद्या व्यापाऱ्यांचा स्वयंस्फूर्तीने “श्रीरामपूर बंद”…
श्रीरामपूर- श्रीरामपूर शहरातील बेलापूररोड बजरंगनगर येथे श्रीरामपूर जिल्हा कृती समिती व शिवप्रहारच्यावतीने “शिवस्मारकासह श्रीरामपूर जिल्हा”मागणीसाठी दि.१६ ॲागस्ट २०२४ पासून असलेल्या साखळी उपोषण आंदोलनाचा आज गुरुवारी ४२ वा दिवस आहे.या मागणीला पाठिंबा देण्यासाठी व शिवभक्त,श्रीरामपूरकरांच्या तीव्र भावनांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी व्यापारी मर्चंट असोसिएशनच्या वतीने उद्या शुक्रवार दिनांक २७ सप्टेंबर २०२४ रोजी स्वयंस्फूर्तीने श्रीरामपूर शहर बंद पाळण्यात येणार आहे.
तरी व्यापारी बांधवांच्या वतीने या आंदोलनाला पाठिंबा म्हणून व ढिम्म सरकारचे लक्ष वेधण्यासाठी उद्या दुपारपर्यंत हा बंद पाळण्यात येणार आहे.याबाबत व्यापारी/मर्चंट असोसिएशनने लेखी पत्र जारी केले आहे.