शिवप्रहार न्युज - अक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास सरळ गुन्हे दाखल करू - श्रीरामपूरचे दोन्ही PI यांचा इशारा…
अक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास सरळ गुन्हे दाखल करू - श्रीरामपूरचे दोन्ही PI यांचा इशारा…
श्रीरामपूर -श्रीरामपूर शहर व तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनुक्रमे नितीन देशमुख व दशरथ चौधरी यांनी एका पत्रकाद्वारे एक जाहीर इशारा दिला आहे.त्यामध्ये म्हटले आहे की,व्हाट्सअप,फेसबुक,इंस्टाग्रामवर राजकीय निवडणुकांमुळे पोस्टचे प्रमाण वाढत चालले आहे.जर कोणी सामाजिक भान विसरून वादग्रस्त,
समाजघातक,अफवाने भरलेल्या,चांगल्या पोस्टमध्ये एडिट करून छेडछाड करुन अशा पोस्ट टाकेल त्याच्यावर सरळ गुन्हा दाखल करून त्याची जेलमध्ये रवानगी केली जाईल.
तसेच काही ग्रुपमध्ये महिला व मुली देखील असतात याचे भान पोस्ट करताना सोशल मीडिया वापरकर्त्यांनी ठेवले पाहिजे.