शिवप्रहार न्युज - नरसाळीजवळ मिरची पूड टाकून एकाला चौघांनी लुटले...
नरसाळीजवळ मिरची पूड टाकून एकाला चौघांनी लुटले...
श्रीरामपूर -श्रीरामपूर तालुक्यातील नरसाळीजवळ मिरची पूड टाकून एका तरुणाला रात्रीच्या वेळी लुटण्याची घटना घडली आहे.
त्याबाबत अधिक माहिती अशी की,शुभम कोतकर, राहणार-करजगाव हा देवळालीवरुन करजगावकडे जात असताना रात्रीच्या सुमारास त्याला नरसाळी जवळील करजगाव शिवरस्त्यावर एका विना नंबरच्या बुलेटवर आलेल्या चौघांना पकडले व शुभम याला मारहाण करून त्याच्या डोळ्यात मिरचीची भुकटी टाकून शुभमकडे असलेले ०५ हजार रुपये व मोबाईल काढून घेतला. या प्रकारामुळे भयभीत झालेल्या शुभमने नरसाळी जवळील राजळे वस्तीकडे पळ काढला.
दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून चारी आरोपींचा शोध सुरू आहे.