शिवप्रहार न्युज - बिबट्याची गाडीवर झडप ! आदिक जखमी!!
बिबट्याची गाडीवर झडप ! आदिक जखमी!!
श्रीरामपूर ( शिवप्रहार न्युज) श्रीरामपूर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ सुरुच असून आज भरदिवसा ५.३० च्या सुमारास शेतकरी आप्पासाहेब दगडू आदिक हे गोदावरी नदी ओलांडून खानापूर - माळवाडगांव रस्याने येत असतांना त्याच्या दुचाकी गाडीवर अचानक बिबट्याने झडप घातली ! आदिक हे दुचाकीसह खाली पडले. त्यांच्या पायाला व खांद्याला बिबट्याचे पंज्यामुळे जखमा झाल्या असून ते जोर जोरात ओरडल्याने बिबट्या पळाला . दुचाकीमुळे बिबट्याला अदिक यांच्या गळ्यावर हल्ला करता आला नाही.
दैव बलवत्तर म्हणून शेतकरी आदिक बचावले.प्रमुख कार्यकर्ते हंसराज आदिक यांचे ते भाऊ आहेत . माळवाडगांव येथील आरोग्य केंन्द्रात त्याचेवर उपचार करण्यात आले. ते सुखरूप आहे. बिबट्याच्या तक्रारी करुन देखील वनविभाग नेहमीच बेजबाबदार असल्याच्या तक्रारी संतप्त शेतकऱ्यांनी केल्या आहेत.