शिवप्रहार न्युज - गावठी रिव्हॅाल्वरसह वार्ड नं.०१ च्या आरोपीला भोकरला धरले…

शिवप्रहार न्युज -  गावठी रिव्हॅाल्वरसह वार्ड नं.०१ च्या आरोपीला भोकरला धरले…

गावठी रिव्हॅाल्वरसह वार्ड नं.०१ च्या आरोपीला भोकरला धरले…

श्रीरामपूर- आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने मा.श्री राकेश ओला, पोलीस अधिक्षक अहिल्यानगर यांनी संपुर्ण जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रे व हत्यारे बाळगणारे इसमांची माहीती काढुन त्यांचेवर कारवाई करण्याबाबत आदेश दिले आहे.

      नमुद आदेशाप्रमाणे मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. बसवराज शिवपुजे श्रीरामपुर विभाग, श्रीरामपुर यांना गुप्त बातमी मिळाली की, श्रीरामपुर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दित भोकर गावाच्या आजुबाजुस एक नारंगी रंगाचा शर्ट, डोक्यात काळी टोपी घातलेला असा इसम त्याचे कब्जात विनापरवाना शस्त्र बाळगुन संशईतरीत्या फिरत आहे. त्यावरुन त्यांनी त्यांचे कार्यालयाचे तसेच श्रीरामपुर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करुन सदर पथकास मार्गदर्शन करुन मिळालेल्या बातमीची खात्री करुन पुढील कारवाई करण्याबाबत आदेशीत केल्याने सदरचे पथकाने ०२ पंचांना घेवुन भोकर गावी जावुन संशईत इसमाचा शोध घेवुन त्याला ताब्यात घेतले व त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव अजीम ऊर्फ अज्जु अन्वर पठाण, वय-२९ वर्षे, रा. मिन्नतनगर, वार्ड नं. १ श्रीरामपुर, ता. श्रीरामपुर, जि. अहिल्यानगर असे सांगीतले.

         आरोपीची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेस खोचलेले १५,०००/- रूपये किंमतीचे एक लोखंडी देशी बनावटीचे रिव्हालवर लाकडी मुठ असलेले त्यास ६ होलचे सिलेंडर असलेले मिळुन आले असुन सदर इसम हा विनापरवाना अग्निशस्त्र बाळगतांना मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन श्रीरामपुर तालुका पोलीस स्टेशनला आणुन त्याचेविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

       सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला, पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर, श्री. वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपुर विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. बसवराज शिवपुजे, श्रीरामपुर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. दशरथ चौधरी, पोलीस उपनिरीक्षक सतिष डौले, पोलीस उपनिरीक्षक संदिप मुरकुटे, पोहेका दादासाहेब लोढे, पोहेका प्रशांत रननवरे, पोका सुनिल शिंदे, पोका नितीन चव्हाण अशांनी केली आहे.