शिवप्रहार न्युज - परतीच्या पावसामुळे श्रीरामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान...
परतीच्या पावसामुळे श्रीरामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान...
श्रीरामपूर -श्रीरामपूर तालुक्यामध्ये गेल्या दोन ते तीन दिवसापासून जोरदार परतीचा पाऊस पडत आहे.यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे.अनेक शेतकऱ्यांचे मकाच्या कणसाचे,कपाशीच्या काढणीला आलेल्या कापसाचे, सोयाबीन तसेच इतर पिकांचे नुकसान या पावसामुळे झाले आहे.
प्रशासनाने या नुकसानाचे पंचनामे करावे व नुकसान भरपाई त्यांना मिळवू द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.