शिवप्रहार न्युज - बंधाऱ्याला कठडे लावले नाही तर राजकारणी व अधिकाऱ्यांना चपलाचा हार घालणार…

शिवप्रहार न्युज -  बंधाऱ्याला कठडे लावले नाही तर राजकारणी व अधिकाऱ्यांना चपलाचा हार घालणार…

बंधाऱ्याला कठडे लावले नाही तर राजकारणी व अधिकाऱ्यांना चपलाचा हार घालणार…

 श्रीरामपूर/वैजापूर- दोन जिल्ह्यांना जोडणारा श्रीरामपूर(जि.नगर)व वैजापूर(जि.संभाजीनगर)च्या सीमेवर असलेल्या कमलपूर बंधाऱ्यावरील पुलाचे कठडे गेल्या अनेक वर्षापासून तुटलेले आहे. याच महिन्यात १० दिवसांपूर्वी दसऱ्याच्या दिवशी या पुलाला कठडे नसल्यामुळे तीन जणांचा बळी मोटरसायकल पडून गेला होता.

         यामुळे संतप्त झालेल्या या भागातील नागरिकांनी जर या पुलाला लवकरात लवकर कठडे बांधले नाही तर राजकारणी नेते आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना काळे फासू किंवा त्यांच्या गळ्यात चपलाचा हार घालू असा इशारा या अतिशय चिडलेल्या नागरिकांनी दिला आहे.