शिवप्रहार न्युज - पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना भारतीय पोलीस सेवेत पदोन्नती...
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना भारतीय पोलीस सेवेत पदोन्नती...
श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज) - अहिल्यानगर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना भारतीय पोलीस सेवेच्या निवड श्रेणीत पदोन्नती मिळाली. या पदोन्नतीमध्ये राज्यातील सुमारे ९ आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तसा आदेश राज्य शासनाच्या गृहविभागाने काढला काढला आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला हे २०१२ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सलग तेरा वर्षे सेवा बजावल्यानंतर आयपीएस अधिकाऱ्यांना भारतीय पोलीस सेवेच्या निवड श्रेणीत पदोन्नती देण्यात येते. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी यापूर्वी श्रीरामपूर, मालेगाव येथे अपर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यकाळ गाजविला. नागपूर शहर पोलीस उपायुक्त, नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक येथे कर्तव्य बजावले. सलग १३ वर्षे सेवा पूर्ण केल्याने त्यांची भारतीय पोलीस सेवेच्या निवड श्रेणीत पदोन्नती मिळाली आहे.
एसपी राकेश ओला यांच्या कार्यकाळात जिल्हयात लोकसभा निवडणुका व विधानसभा निवडणुका चोख पार पडल्या. जिल्ह्यातील संगमनेर, श्रीरामपूर, नगर शहर, ममदापूर व इतर भागात गोवंश जणावरांची कत्तल गोमांस यावर अनेक कारवाया करण्यात आल्या त्या सुरुच आहेत. अनेक गंभीर गुन्हयात आरोपी पकडले जाऊन जिल्हा पोलीस यंत्रणा एसपी राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रफळाने मोठ्या असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था राखन्याचे काम करत आहे . एसपी राकेश ओला यांचे अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.