शिवप्रहार न्युज - अल्पवयीन मुलाचा लैंगिक कृत्याचा व्हिडीओ व्हायरल;श्रीरामपुरात एकावर गुन्हा…

शिवप्रहार न्युज - अल्पवयीन मुलाचा लैंगिक कृत्याचा व्हिडीओ व्हायरल;श्रीरामपुरात एकावर गुन्हा…

अल्पवयीन मुलाचा लैंगिक कृत्याचा व्हिडीओ व्हायरल;श्रीरामपुरात एकावर गुन्हा…

श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- श्रीरामपूर शहरातील इयत्ता १० वीत शिकणाऱ्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाचा लैंगिक कृत्य करतानाचा व्हिडीओ इंटरनेटद्वारे ऑनलाईन साईटवरून व्हायरल केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

        शहरातील एका भागातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलगा आपल्या घराच्या गच्चीवर लैंगिक कृत्य करत असताना शेजारील बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर भाडोत्री राहणाऱ्या एकाने गॅलरीतून मोबाईलद्वारे व्हिडीओ काढून तो व्हायरल केला. सदरचा व्हिडीओ अल्पवयीन मुलाच्या वडीलांना त्यांच्या पुतण्याने दाखवल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी अल्पवयीन मुलाच्या वडीलांनी श्रीरामपूर शहर पोलिसात फिर्याद दिल्यावरून महेश नावाच्या आरोपीविरूद्ध भारतीय न्यायसंहितासह पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

     पुढील तपास पोनि. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत. दरम्यान या प्रकाराने श्रीरामपुरासह सर्वत्र पालकांमध्ये खळबळ उडाली आहे.