शिवप्रहार न्युज - श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवाडगावचा तरूण बेपत्ता...
श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवाडगावचा तरूण बेपत्ता...
श्रीरामपूर - श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवाडगाव येथील कुणाल शिवाजी पवार (वय २२) हा रविवारी (दि. २९) दुपारी गावातून जाऊन येतो,असे सांगून घरातून निघून गेला.परंतु तो अद्याप आलाच नाही. याबाबत श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात शिवाजी बबनराव पवार (रा. मुठेवाडगाव) यांनी बेपत्ता झाल्याची खबर दिली असून त्याचा शोध सुरू आहे.
कुणाल हा रंगाने गोरा, चेहरा उभट, नाक सरळ,शरीराने सडपातळ, डोळे काळे, उंची ५ फूट ७ इंच आहे.तर त्याने अंगात चॉकलेटी रंगाचा गोल कॉलरचा टी-शर्ट व काळी निळसर नाईट पँट घातलेली आहे आणि पायात स्लीपर चप्पल, हातात चांदीचे ब्रेसलेट तसेच गळ्यात चांदीची चेन आहे. कुणाल दिसून आल्यास श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.