शिवप्रहार न्यूज - पत्नीविषयी अपशब्द वापरल्याचा राग मनात धरुन खुन करणारा आरोपी व त्याचा अल्पवयीन साथीदार २४ तासाचे आत ताब्यात;स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई…

शिवप्रहार न्यूज - पत्नीविषयी अपशब्द वापरल्याचा राग मनात धरुन खुन करणारा आरोपी व त्याचा अल्पवयीन साथीदार २४ तासाचे आत ताब्यात;स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई…

पत्नीविषयी अपशब्द वापरल्याचा राग मनात धरुन खुन करणारा आरोपी व त्याचा अल्पवयीन साथीदार २४ तासाचे आत ताब्यात;स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई…

श्रीरामपूर-प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दिनांक ०९/०६/२३ रोजी फिर्यादी श्री. साजीद छोटु शहा वय २६, रा. गोंधवणी रोड, दत्त मंदीरा जवळ, वॉर्ड नं. १, ता. श्रीरामपूर यांचा भाऊ नामे तन्वीर शहा याने इसम नामे सुनिल देवकर याचे पत्नी विषयी अपशब्द वापरल्याचा राग मनात धरुन चॉपर सारख्या धारदार शस्त्राने वार करुन गंभीर जखमी करुन जिवे ठार मारले. सदर घटने बाबत फिर्यादी यांनी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारी वरुन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. ५५३ / २०२३ भादविक ३०२, ३४ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

      सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन घटना ठिकाणास समक्ष भेट देवुन पोलीस अधीक्षक मा. श्री. राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना सदर स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन गुन्ह्याचा समांतर तपास करुन फरार आरोपींचा शोध घेवून कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.

          नमुद आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, सहाय्यक फौजदार भाऊसाहेब काळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल विजयकुमार वेठेकर, अतुल लोटके, देवेंद्र शेलार, पोलीस नाईक रविंद्र कर्डीले, संतोष लोढे, बाळासाहेब गुंजाळ, गणेश भिंगारदे, फुरकान शेख, पोलीस कॉन्स्टेबल रणजीत जाधव, किशोर शिरसाठ, गणेश भिंगारदे, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड व चालक बबन बेरड अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांची दोन पथके नेमुन खात्री करुन कारवाई करणे बाबत सुचना देवुन पथक रवाना केले. 

      पथक आरोपीची माहिती घेत असताना पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदार मार्फत माहिती मिळाली की, वर नमुद खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी नामे सुनिल देवकर त्याचे साथीदाराहस राहुरी रेल्वे स्टेशन परिसरात असुन कोठे तरी पळुन जाण्याच्या तयारीत आहेत आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पथकास राहुरी रेल्वे स्टेशन परिसरात जावुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आदेश दिल्याने पथकाने प्रवासी म्हणुन वेशांतर करुन, सापळा लावुन थांबलेले असताना बातमीत नमुद वर्णनाप्रमाणे एक इसम साथीदारा सोबत राहुरी रेल्वे स्टेशन परिसरात बसलेला दिसला पथकाने त्यास जागीच पकडुन पोलीस पथकाच ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव १) सुनिल सिताराम देवकर वय २२, रा. महादेवनगर, गोंधवणी, वॉर्ड नं. १, ता. श्रीरामपूर व सोबत त्याचा साथीदार एक विधीसंघर्षीत बालक मिळुन आल्याने त्यांचेकडे वर नमुद गुन्ह्याबाबत विचारपुस करता त्या दोघांनी मिळुन वर नमुद गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांना ताब्यात घेवुन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन करीत आहे.

       सदरची कारवाई अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती. स्वाती भोर मॅडम,उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी विभाग, अतिरिक्त प्रभार श्रीरामपूर विभाग संदीप मिटके यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.