शिवप्रहार न्युज - श्रीरामपूर शहर पोलीसांकडून वाहनचालकांवर कारवाई सुरू; ३६ हजारांचा दंड...

श्रीरामपूर शहर पोलीसांकडून वाहनचालकांवर कारवाई सुरू; ३६ हजारांचा दंड...
श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- श्रीरामपुर शहरात व परिसरात विना नंबर प्लेट तसेच फॅन्सी नंबर प्लेटच्या फिरणाऱ्या दु व्हीलर, फोर व्हीलर तसेच चार चाकी वाहनाच्या काचांना गडद काळया रंगाच्या फिल्म लावुन बेकायदेशीर, नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यासाठी काल दिनांक २३/०४/२०२५ रोजी पासुन श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन हद्दीत वाहन तपासणी धडक मोहीम सुरु केली आहे.
मोहिमेच्या काल पहिल्याच दिवशी काळया फिल्म असणाऱ्या १५ वाहनावर कारवाई करुन काळया फिल्म काढून घेण्यात आल्या आहेत. तसेच फॅन्सी नंबर प्लेट असणाऱ्या ८ व इतर ३२ व अनियमीतता असलेल्या वाहनावर कारवाई करुन ३६२५०/- रु दंड करण्यात आला व १९७००/- रु दंड रोख वसुल करण्यात आला आहे.
श्रीरामपुर शहर व परिसरातील वाहन धारकांनी आपली वाहने शासनाने विहीत केलेल्या निमयमानुसार वापरावीत विना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट तसेब चार चाकी वाहनांच्या काचाना गडद काळया रंगाच्या फिल्म लावुन आढळून आल्यास सदरची वाहने ताब्यात घेवून वाहन चालक व मालक यांचेविरुध्द प्रचलित कायदयानुसार कायदेशिर कारवाई केली जाईल असे पोनि.नितीन देशमुख यांनी सांगितले.