शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूर शहरात वकीलाच्या घरात घुसून 02 मोबाईल चोरले…

शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूर शहरात वकीलाच्या घरात घुसून 02 मोबाईल चोरले…

श्रीरामपूर शहरात वकीलाच्या घरात घुसून 02 मोबाईल चोरले…

श्रीरामपूर(शिवप्रहार न्युज)-वकीलाच्या घरात घुसून हॉलमध्ये ठेवलेले 2 मोबाईल चोरून नेण्याचा प्रकार श्रीरामपूर शहरात घडला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, नामदेव मंदिरासमोर, गिरमे चौक, वार्ड नं.3 येथे राहणारे राजीव बाबारावजी भोंबे, वय-40, धंदा-वकीली हे काल रात्री बाहेरून आल्यानंतर हॉलमध्ये मोबाईल ठेवून फ्रेश होण्यासाठी गेले होते. ते फ्रेश होवून आले असता रात्री 9.45 च्या सुमारास त्यांना बाहेरच्या गेटमधून एकजण पळताना दिसला. त्यानंतर त्यांनी घरामध्ये पाहीले असता हॉलमध्ये ठेवलेले अ‍ॅपल-11 कंपनीचा 75 हजार रूपये किंमतीचा मोबाईल व एक सॅमसंग कंपनीचा एम-30 हा 25 हजार रूपये किंमतीचा मोबाईल, असे 1 लाख रूपये किंमतीचे दोन मोबाईल हॅन्डसेट घरात घुसून चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले. 

      याप्रकरणी राजीव भोंबे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरटयाविरूदध्द श्रीरामपूर शहर पोलिसात भादंवि कलम 380,457 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोनि.हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोकॉ.खेडकर हे करीत आहेत.