शिवप्रहार न्युज - लग्नास नकार दिल्याने मुलीच्या वडिलांच्या गळ्यावर वार; आरोपी श्रीरामपूरचा...

शिवप्रहार न्युज - लग्नास नकार दिल्याने मुलीच्या वडिलांच्या गळ्यावर वार; आरोपी श्रीरामपूरचा...

लग्नास नकार दिल्याने मुलीच्या वडिलांच्या गळ्यावर वार; आरोपी श्रीरामपूरचा...

    अहिल्यानगर (शिवप्रहार न्युज)- एमआयडीसीतील एका कंपनीत राहणाऱ्या कुटुंबातील मुलीने लग्नास नकार दिल्याने मुलीच्या वडिलास धारदार शस्त्राने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन अण्णासाहेब पेटारे ( मूळ रा. श्रीरामपूर, हल्ली रा.मढी, ता. पाथर्डी, अहिल्यानगर) असे आरोपीचे नाव आहे. 

        याबाबत जखमी मधुकर नाथा ससाणे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीत म्हटले, की कंपनीमध्ये असताना नितीन अण्णासाहेब पेटारे तेथे आला. तो म्हणाला तुमच्या मुली बरोबर लग्न करायचे आहे. तिचे म्हणणे काय आहे ते सांगा. मात्र, मुलीने लग्नास नकार दिला. मुलीने नकार दिल्यानंतर तिला ठार मारू टाकीन अशी धमकी दिली. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी माझ्या मुलीच्या नादी लागू नको, असे म्हणाल्याचा राग येऊन आरोपीने धारदार शस्त्राने गळ्यावर वार केले. शिवीगाळ दमदाटी केली असे फिर्यादीत म्हटले आहे.