शिवप्रहार न्युज - श्री तुळजाभवानी मंदिरात सोमवारपासून श्री नवनाथ कथा...

शिवप्रहार न्युज -  श्री तुळजाभवानी मंदिरात सोमवारपासून श्री नवनाथ कथा...

श्री तुळजाभवानी मंदिरात सोमवारपासून श्री नवनाथ कथा...

  श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- शहराजवळील शिरसगाव येथील इंदिरानगर येथे असलेल्या श्री तुळजाभवानी मंदिराच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त सोमवार दिनांक 3 फेब्रुवारी पासून संगितमय श्री नवनाथ भक्तिसागर कथेचे आयोजन करण्यात आले आहे. सदरची कथा श्रीक्षेत्र गोरक्षनाथ संस्थानचे मठाधिपती, ब्रह्मचारी हभप. श्री.सेवानाथ महाराजांच्या सुश्राव्य वाणीतून होणार आहे. कथा दररोज संध्याकाळी 7:30 ते 10:30 या वेळेत कथा होणार आहे.

   कथाकाळात विविध धार्मिक कार्यक्रम होणार असून मंगळवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:30 वाजता श्री.श्री.108 रामदास महाराज कर्णाल यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे. श्री नवनाथ भक्तिसार कथा सोहळ्याची सांगता सोमवार दिनांक 10 फेब्रुवारी रोजी होणार असून संध्याकाळी 6 ते 8 या वेळेत श्री महंत नित्यानंदगिरी महाराज यांचे काल्याचे किर्तन त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.

   श्री नवनाथ भक्ती सागर कथा सोहळ्यामध्ये भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन श्री तुळजाभवानी मंदिर, श्री राजे छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान यांच्यासह शिरसगाव ग्रामस्थांनी केले आहे.