शिवप्रहार न्युज - नामदेव दहातोंडेंचे शिर विहीरीत तर धड कोरड्या विहिरीत ! खळबळ!! 

शिवप्रहार न्युज -  नामदेव दहातोंडेंचे शिर विहीरीत तर धड कोरड्या विहिरीत ! खळबळ!! 

नामदेव दहातोंडेंचे शिर विहीरीत तर धड कोरड्या विहिरीत ! खळबळ!! 

नेवासा ( शिवप्रहार न्युज) शेवगाव तालुक्यातील बोधेगांव येथील नामदेव रामा दाहातोंडे,वय -७१ यांचा धारधार हत्याराने खून करून मुंडके धडावेगळे करून ते मुंडके सुशिलाबाई पाटीलबा तांबे रा . बोधेगांव यांच्या मालकीचे विहिरीत टाकून दिले.तर मुंडके नसलेले धड अविनाश बापू कदम रा . बोधेगांव यांचे कोरड्या विहिरीत टाकून दिले . हा निर्घुन खुन अज्ञात कारणासाठी अज्ञात आरोपींनी केल्याची तक्रार मयत नामदेव दाहातोंडे यांचा मुलगा गौतम नामदेव दाहातोंडे यांनी शेवगांव पोलीसात दिल्यावरून अज्ञात आरोपी विरुद्ध भा . न्या . स . कलम १०३ (१) १३८ प्रमाणे खुनाचा गुन्हा काल दाखल झाला आहे.

        घटनेची खबर मिळताच कर्तव्यदक्ष एसपी राकेश ओला यांनी घटनास्थळी भेट देवून तपासकामी आवश्यक त्या सूचना केल्या.या प्रकरणी पोनि नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई महाले हे पुढील तपास करित आहेत . या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे .