शिवप्रहार न्युज - प्रियसीचा फोन,बायकोची मारहाण; श्रीरामपूर तालुक्यातील घटना...

शिवप्रहार न्युज - प्रियसीचा फोन,बायकोची मारहाण; श्रीरामपूर तालुक्यातील घटना...

प्रियसीचा फोन,बायकोची मारहाण; श्रीरामपूर तालुक्यातील घटना...

श्रीरामपूर - श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील ड्रायव्हिंग काम करणाऱ्या एका व्यक्तीचे त्याच्याच घराजवळील एका महिलेसोबत प्रेम प्रकरण चालू होते. ०२ दिवसापूर्वी सकाळी हा ड्रायव्हर व्यक्ती त्याच्या घरात आंघोळ करत असताना त्याच्या मोबाईलवर प्रियसीचा सारखा-सारखा फोन येत होता आणि संशयामुळे तो फोन या ड्रायव्हरच्या बायकोने उचलला. त्यामुळे ड्रायव्हर आणि त्याच्या प्रियसीच्या प्रेमाचे बिंग फुटले.

       त्यानंतर चिडलेल्या बायकोने त्या नवऱ्याच्या प्रियसीच्या घरात घुसून तिला फटके दिले तर मध्ये पडलेल्या नवऱ्याला देखील तिने टोले दिल्याचे समजते.या प्रसंगाची दोन दिवसापासून उक्कलगाव भागात जोरदार-चवदार चर्चा चालू आहे.