शिवप्रहार न्युज - शिवप्रहारचे मावळे व ग्रामस्थांनी गोमांस विकणारा आरोपी दिला पोलीसांच्या ताब्यात…

शिवप्रहारचे मावळे व ग्रामस्थांनी गोमांस विकणारा आरोपी दिला पोलीसांच्या ताब्यात…
हमरापूर/बाजाठाण,ता.वैजापूर,
जि.छ.संभाजीनगर - याबाबत अधिक माहिती अशी कि,आज गुरुवार दि.१३ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी हमरापुर-बाजाठाण पंचक्रोशी येथे गोवंशाची कत्तल करून विक्री करणारा कुरेशी नामक कसायाला "शिवप्रहार"च्या मावळ्यांनी व ग्रामस्थांनी पकडुन धडक कारवाई करत वीरगाव जि.छ.संभाजीनगर पोलीसांच्या ताब्यात दिले.हा आरोपी गंगापूर येथून गोमांस विक्रीसाठी दर गुरुवारी गावात आणतो असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.पोलीस अधिकारी वाघमोडे यांच्या पथकाने आरोपीला पुढील कारवाई करण्यासाठी वीरगाव पोलीस ठाणे येथे नेले आहे.
यावेळी शिवभक्त शरद चौधरी,निलेश तोडमल,पवन भराडे,आकाश भराडे,दिपक भराडे,ज्ञानेश्वर भराडे,शुभम चौधरी,विशाल चौधरी,कृष्णा मेघळे,अविनाश भराडे,दादासाहेब भराडे,शिवा दळे,विक्रम जवादे,अशोक गायकवाड, आशिष भागडे,शिवाजी चौधरी,सुदाम चौधरी,अक्षय भराडे,सौरभ सवई माऊली बनसोडे व पाटील ग्रुपचे सदस्य,ग्रामस्थ व सर्व शिवभक्त उपस्थित होते.
यासमयी हभप हरिशरणजी महाराज,सरपंच व पदाधिकारी यांनी सहकार्य केले.