शिवप्रहार न्युज - भरदिवसा लाखभर रुपये चोरणारा चोरटा श्रीरामपुरात CCTV मध्ये कैद…

शिवप्रहार न्युज -  भरदिवसा लाखभर रुपये चोरणारा चोरटा श्रीरामपुरात CCTV मध्ये कैद…

भरदिवसा लाखभर रुपये चोरणारा चोरटा श्रीरामपुरात CCTV मध्ये कैद…

 श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- श्रीरामपूर शहरात मध्यवस्तीत असणाऱ्या मेडिकलच्या दुकानाच्या ड्रॉवरमधून १ लाख ३ हजार रूपयांची रोकड भरदिवसा चोरून नेण्याची घटना घडली आहे.हि घटना सीसीटिव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे.

     प्रमोद लक्ष्मण जोशी, रा. वॉर्ड नं.७, काळाराम मंदिरामागे, श्रीरामपूर यांचे वॉर्ड नं. ६, बैरागी हॉस्पीटल येथे नवांश मेडिकल ॲन्ड जनरल स्टोअर्स नावाचे दुकान आहे. जोशी हे स्वतः ते दुकान चालवतात. त्यांच्या दुकानात समिक्षा नावाची मुलगी कामाला आहे. दिवसभर दुकानात जमा झालेला गल्ला ते काउंटरच्या ड्रॉवरमध्ये ठेवत असतात. काल नेहमीप्रमाणे दुकान उघडल्यावर आदल्या दिवशी ठेवलेले १ लाख ३ हजार रूपये ड्रॉवरमध्ये तसेच होते. दुपारी ३ वा. जोशी हे जेवायला घरी गेले होते. त्यावेळी दुकानात काम करणारी मुलगी ही दुकानाचे शटर ओढून बैरागी हॉस्पीटलच्या वरच्या मजल्यावर जेवण करायला गेली असताना कोणीतरी अज्ञात चोरटयाने दुकानाचे हे शटर उघडून दुकानातील ड्रॉवरमध्ये ठेवलेले १ लाख ३ हजार रूपये चोरून नेले. 

     याप्रकरणी प्रमोद जोशी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरटयाविरूद्ध श्रीरामपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत.