शिवप्रहार न्युज - पोनि.देशमुख यांचा श्रीरामपुरातील मोकळ्या मैदानांवर बसणाऱ्या पेताडांना 'झटका'...

पोनि.देशमुख यांचा श्रीरामपुरातील मोकळ्या मैदानांवर बसणाऱ्या पेताडांना 'झटका'...
श्रीरामपूर - शहरातील विविध मोकळ्या मैदानांमध्ये रात्रीच्या वेळी अंधारात दारू पिण्यासाठी बसणाऱ्या पेताडांना शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.नितीन देशमुख यांनी काल शुक्रवारी रात्री चांगला धडा शिकवला.
याबाबत अधिक माहिती अशी की,शहरात अनेक ठिकाणी मोकळ्या मैदानांमध्ये तरुण पोरं रात्री अंधारात दारु पिण्यासाठी बसतात. काल शुक्रवारी रात्री पोलीस निरीक्षक देशमुख यांनी श्रीरामपूर शहरातील विविध मैदान ज्यामध्ये थत्ते ग्राऊंड,कचेरी जवळचे मैदान,पाटाच्या दोन्ही बाजूचे जॉगिंग ट्रॅक,नॅार्दन ब्रॅच संगमनेररोड जवळील मैदान, बजरंगनगर-पूर्णवादनगर चे पंचावन मैदान अशा विविध मोकळ्या जागेमध्ये बसणाऱ्या पेताडांची झाडाझडती घेतली.यावेळी दारू पिण्यासाठी बसलेल्या पेताड लोकांना पोलीस निरीक्षक देशमुख व त्यांच्या टीमने बैठका मारण्यास सांगितले. १०० बैठका या पेताडांकडून मारून घेण्यात आल्या व पेताडांना "झटका" देण्यात आला. पुन्हा सार्वजनिक ठिकाणी असे न करण्याची कडक समज पोलीसांनी दिली.
कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या या कारवाईमुळे शहरातील जागरूक नागरिकांनी कौतुक केले आहे.तसेच नमूद मैदानांच्या परिसरातील महिलांमध्ये देखील सुरक्षेचे वातावरण निर्माण झाले आहे.