शिवप्रहार न्युज - कार्यकारी अभियंता भंगाळे यांच्या निलंबनाची मागणी; गंभीर आरोप करत पालकमंत्र्यांना दिले निवेदन...

कार्यकारी अभियंता भंगाळे यांच्या निलंबनाची मागणी; गंभीर आरोप करत पालकमंत्र्यांना दिले निवेदन...
श्रीरामपूर - महावितरण चे कार्यकारी अभियंता श्री.अजय भंगाळे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले असून त्यांचे निलंबन करण्याची मागणी तांत्रिक कामगार युनियनने पत्राद्वारे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,अजय भंगाळे यांनी मानसिक त्रास देत,दडपशाही करत त्रास दिला.त्यांच्या छळवणुकीमुळे ०२ वर्षात महावितरण चे संदीप पाटोळे,संतोष तागड,नारायण घोरपडे,सचिन वानखेडे, सतीश तिडके
आत्महत्या केली असल्याचा आरोप या पत्रकामध्ये करण्यात आला आहे.
या निवेदनाबाबत पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेऊन पुढील कारवाई करू असे आश्वासन युनियनला दिले आहे.