शिवप्रहार न्युज - शिवप्रहारच्या आंदोलनाला अनेक संघटनांचा आझाद मैदान,मुंबई येथे येवुन पाठिंबा;आज आंदोलनाचा ०६ वा दिवस...

शिवप्रहार न्युज - शिवप्रहारच्या आंदोलनाला अनेक संघटनांचा आझाद मैदान,मुंबई येथे येवुन पाठिंबा;आज आंदोलनाचा ०६ वा दिवस...

शिवप्रहारच्या आंदोलनाला अनेक संघटनांचा आझाद मैदान,मुंबई येथे येवुन पाठिंबा;आज आंदोलनाचा ०६ वा दिवस...

मुंबई/श्रीरामपूर - लव्ह जिहादच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने कायदा पारित करावा व श्रीरामपूर जिल्हा घोषित करावा या मुख्य मागणींकरता दि.०५ जुलै २०२३ पासून शिवप्रहार प्रतिष्ठानच्या वतीने माजी पोलीस अधिकारी श्री.सुरजभाई आगे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू आहे.आज सोमवार दि १० जुलै रोजी या आंदोलनाला ०६ दिवस होत आहे.आंदोलनाला प्रत्यक्ष येवुन पाठिंबा देणाऱ्यांची संख्या वाढत आहे. 

        दरम्यान या आंदोलनाला हिंदू एकता आंदोलन पक्ष,शिव प्रतिष्ठानयुवा हिंदुस्तान, छावा संघटना,हिंदवी स्वराज्य संघटना, आरपीआय, इस्कॉन,शिवभक्त संघटना नागपूर, शेतकरी कामगार पक्ष,विष्णू सानप मित्र मंडळ बुलढाणा इत्यादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आझाद मैदान, मुंबई येथे प्रत्यक्ष येऊन पाठिंबा दिला.

       या धरणे/ठिय्या आंदोलनात सरकारकडे लव्ह जिहाद कायदा व प्रभू श्रीरामांच्या नावाने वसलेले “श्रीरामपूर जिल्हा”घोषित करावे यासह छत्रपती संभाजीनगर नामकरणची थांबलेली अंमलबजावणी पुन्हा सुरू करावी,श्रीरामपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य शिवस्मारकास शासनाने मंजुरी द्यावी तसेच देशभक्त IRS अधिकारी समीरजी वानखेडे यांच्यावरील गुन्हा मागे घेण्यात यावा यादेखील इतर मागण्या करण्यात आलेल्या आहे.

        गेल्या ०४ महिन्यापासून शिवप्रहार प्रतिष्ठानच्या वतीने माय-लेकींचे संरक्षण व्हावे व लव्ह जिहादसंदर्भात जनजागृती व्हावी म्हणून बिगरराजकीय पद्धतीने "भवानी रक्षा मोहीम"चालू आहे.या मोहिमेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील १० जिल्ह्यांमध्ये शिवप्रहार प्रतिष्ठानच्या वतीने तब्बल १५० पेक्षा जास्त जनजागृतीचे कार्यक्रम घेण्यात आले.या कार्यक्रमांना माता-भगिनींसह हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती.