शिवप्रहार न्यूज - रिचार्ज करायला गेलेल्या मुलीचा मोबाईल दुकानात विनयभंग ! खळबळ बेनकेला अटक !
रिचार्ज करायला गेलेल्या मुलीचा मोबाईल दुकानात विनयभंग ! खळबळ बेनकेला अटक !
अकोले /संगमनेर (शिवप्रहार न्यूज)-अकोले तालुक्यातील समशेरपुर येथे मातोश्री जनरल स्टोअर्स या दुकानात गावातील एक दहा वर्षाची लहान मुलगी मोबाईल रिचार्ज करण्यासाठी सायंकाळी सातच्या सुमारास गेली असता दुकानचालक आरोपी दिगंबर रामनाथ बेनके ,वय ३२ या आरोपीने सदर लहान मुलीला दुकानाच्या आत बोलवले तिला दुकानाच्या मागच्या भागात नेऊन तिच्या कपड्यात हात घालून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून विनयभंग केला.
दहा वर्षाच्या मुलीने कशीबशी सुटका करून घाबरून ती घरी आली.तिने झालेला प्रकार घरी सांगितला.तातडीने मुलीच्या नातेवाईकानी पोलीसात धाव घेतली व आईने अकोले पोलिसात फिर्यादी दिली.त्यावरून आरोपी दिगंबर रामनाथ बेनके याच्याविरुद्ध भादवी कलम 354 बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा सन 2012 चे कलम 8, 12 प्रमाणे विनयभंगाचा पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला असून या गंभीर घटनेची खबर मिळताच सपोनी घुगे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
तपासाची चक्र फिरवून दुकान चालक दिगंबर बेनके याला पोलिसांनी काल अटक केली असून पुढील तपास पोसई हंडोरे हे करीत आहे.गावातीलच दुकानात गावातीलच दहा वर्षाची मुलगी मोबाईल रिचार्ज करण्यासाठी गेली आणि तिचा भयंकर प्रकारे विनयभंग झाल्याने मुलींची सुरक्षितता व लिंगपिसाट वृत्तीच्या आरोपींमुळे गावासह अकोले तालुक्यात खळबळ उडाली आहे .