शिवप्रहार न्यूज - जय मातादी मित्र मंडळाच्या शिष्ट मंडळाने घेतली भाजपा चे प्रदेश अध्यक्ष रैना व जम्मू येथील खासदार शर्मा यांची भेट

शिवप्रहार न्यूज - जय मातादी मित्र मंडळाच्या शिष्ट मंडळाने घेतली भाजपा चे प्रदेश अध्यक्ष रैना व जम्मू येथील खासदार शर्मा यांची भेट

जय मातादी मित्र मंडळाच्या शिष्ट मंडळाने घेतली भाजपा चे प्रदेश अध्यक्ष रैना व जम्मू येथील खासदार शर्मा यांची भेट

श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- जय मातादी मित्र मंडळाच्या शिष्ट मंडळलाने जम्मू काश्मीर भाजपा प्रेदेश अध्यक्ष रवी रैना व खासदार जुगलकिशोर शर्मा यांची भेट घेऊन अनेक विषयावर चर्चा करुन वेग वेगळ्या विषयावर मागणी केली. या शिष्टमंडळात भाजपाचे जिल्हा सरचिटणिस नितिन दिनकर, श्रीरामपूर नगरपरिषद चे माजी उपनगरध्याक्ष व मंडळाचे स़स्थापक रविंद्र गुलाटी, नगरसेवक राजेश अलघ,भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष बबनराव मुठे, दुर्गा भवानी सेवा मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष शम्मीकुमार गुलाटी केमिस्ट असोसिएशनचे ओम नांरग, पंच गंगा उद्योग समूहाचे प्रभाकर शिंदे यांनी जम्मू येथे खा.शर्मा यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली.

   श्रीरामपुर येथील जय मातादी मित्र मंडळ गेल्या १४ वर्षा पासुन दर वर्षी हजारो भाविक वैष्णव देवी दर्शनासाठी नेत असतात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने ३७० कलम रद्द केल्या नंतर तीन वर्षा पूर्वी जय माता दी मंडळाने कटारा येथे भक्त निवासा साठी जागेची मागणी केली होती. तसेच पुणे, बेलापुर येथून येणारी झेलम एक्सप्रेस ही रेल्वे गाडी थेट वैष्णोदेवी-कटरा रेल्वे स्टेशन पर्यंत घेऊन जाण्याची, तसेच शिर्डी ते जम्मू विमान सेवा सुरू करण्या बाबत च्या मागण्या मंडळाने केल्या.

  या शिष्टमंडळाने या विषयावर चर्चा करत असताना स्वत खा.शर्मा म्हणाले की, या मंडळाने वैष्णव देवी कटारा येथे भक्तनिवास साठीची जागेबाबत तीन वर्षा पुर्वीच जागेची मागणी केली होती, पंरतू दोन वर्ष कोविड काळ व जम्मू राज्य केंद्र शासीत राज्यपाल असल्याने हे काम मागे पडले. पण नक्कीच जय मातादी मित्र मंडळ हे भक्तांची वैष्वण देवी दर्शनाची खूप चांगली सोय करतात हे मी स्वतः पाहिले आहे आणि माझ भाग्य आहे या मंडळाची सेवा करण्याचे काम मला मिळालं हे मंडळ माझंच मंडळ समजून सर्वपरी सहकार्य करणार असल्याचे आश्वासन खा.शर्मा यांनी या वेळी दिले.

या शिष्ट मंडळात जय मातादी मित्रमंडळाचे प्रंशात अलग, महाराज कत्रोंड, अनिल गुप्ता, बंटी थांपर, बॉबी सहाणी, धिरज गुजर, चेतन जग्गी, भरत कुमार, लकी गुप्ता, सुमित गुलाटी, अक्षय अलग, अनिल छाबडा, सुनिल अग्रवाल, अमन अलग यांच्या सह मंडळाचे आदि कार्यकर्त उपस्थितीत होते.

वैष्णव देवीला नगरसेवक राजेश अलघ यांच्या माता की चौकी या भजन संध्या कार्यक्रमाला उस्फुर्त प्रतिसाद देऊन अनेक भाविकांनी नाचून गाऊन घेतला आनंद.