शिवप्रहार न्यूज - श्रीरामपुरात अद्रकने खाल्ला भाव; होलसेल १०० तर किरकोळ २०० ₹ दराने विक्री

शिवप्रहार न्यूज - श्रीरामपुरात अद्रकने खाल्ला भाव; होलसेल १०० तर किरकोळ २०० ₹ दराने विक्री

श्रीरामपुरात अद्रकने खाल्ला भाव; होलसेल १०० तर किरकोळ २०० ₹ दराने विक्री…

श्रीरामपूर- श्रीरामपूर शहरात आज शुक्रवारच्या बाजारच्या दिवशी आलं/अद्रकने प्रचंड भाव खाल्ला आहे.किरकोळ बाजारात ५० रुपये पावशेर दराने अद्रकाची विक्री होत असून दोनशे रुपये किलो दर किरकोळ विक्रेते घेत आहे.दुसरीकडे मात्र लिलावाच्या ठिकाणी चांगल्या अद्रकची शंभर रुपये ते १४० रुपये किलो दराने विक्री होत आहे. शेतकऱ्यांना आद्रक उत्पादनातून नफा होणार असून ज्या शेतकऱ्यांकडे सध्या अद्रक आहे अशांना निश्चितच आर्थिक लाभ होणार आहे.

       अवकाळी पावसामुळे अनेक शेती पिकांचे नुकसान झाले.मे महिना लागला तरी कोथिंबिरीला व पालेभाज्याला भाव वाढले नाही.भेंडी,वांगे,भाव स्थिर आहेत. मात्र सर्वात महत्त्वाचा असलेल्या आद्रकाने उच्चांक गाठला असून दोनशे रुपये किलोने किरकोळ विक्री हा या वर्षातील अद्रकाच्या दराचा विक्रम असून लसूणही भाव खाऊ लागलाय. लसूण 80 ते 120 रुपये किलो विकला जात आहे.