शिवप्रहार न्यूज - श्रीरामपूर शहरात बिबट्याचे दर्शन...
श्रीरामपूर शहरात बिबट्याचे दर्शन...
श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- शहरात मोरगे वस्ती परिसरात जव्हार कारखान्याजवळ बिबट्या दिसल्याने सकाळी फिरणाऱ्यांमध्ये घबराट पसरली असून एकंदरच पहाटेच्या वेळी बिबट्याचे दर्शन झाले आहे. एका सीसीटीव्हीत बिबट्या कैद झाला असून त्याची जोरदार चर्चा शहरात सुरू आहे. गेल्या वर्षी मोरगे वस्ती भागात बिबट्या नागरी वस्तीत घुसला तेथे एका वन कर्मचाऱ्यांचा जखमी होवून बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यामुळे बिबट्याची बातमी कानावर पडतात नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.