शिवप्रहार न्यूज - अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारे सख्ये भाऊ जेरबंद; एलसीबीची कामगिरी

शिवप्रहार न्यूज -  अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारे सख्ये भाऊ जेरबंद; एलसीबीची कामगिरी

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारे सख्ये भाऊ जेरबंद; एलसीबीची कामगिरी

नगर (शिवप्रहार न्युज)- कर्जत तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून दोन महिन्यापासून पसार झालेल्या सख्या भावांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राजु समशुद्दीन शेख (वय 31) व अजीज समशुद्दीन शेख (वय 28 दोघे रा. थोटेवाडी, दुरगाव, ता. कर्जत) अशी त्यांची नावे आहेत. अल्पवयीन मुलगी स्वयंपाक घरात काम करत असताना राजु शेख व अजीज शेख यांनी पाणी पिण्याचा बहाणा करून घरात प्रवेश केला. तिचे दोन्ही हात बांधून तोंडात रूमाल कोंबुन अत्याचार केला होता. यासंदर्भात कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. गुन्हा दाखल झाल्यापासून शेख बंधू पसार झाले होते. ते केडगाव चौफुला (ता. दौंड, जि. पुणे) येथे असल्याची माहिती एलसीबीला मिळाली होती.

पोलीस अधीक्षक ओला, पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, अंमलदार बबन मखरे, सुनील चव्हाण, अतुल लोटके, रवींद्र कर्डिले, भिमराज खर्से, फुरकान शेख, रोहित मिसाळ, भाऊसाहेब काळे, जालिंदर माने, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, उमाकांत गावठे यांच्या पथकाने सदर ठिकाणी शेख बंधूंचा शोध घेऊन वेशांतर करून त्यांना ताब्यात घेत अटक केली आहे.