शिवप्रहार न्युज - जिल्हा मागणीसाठी श्रीरामपूर शहरासह ग्रामीण भागात कडकडीत बंद...

शिवप्रहार न्युज - जिल्हा मागणीसाठी श्रीरामपूर शहरासह ग्रामीण भागात कडकडीत बंद...

जिल्हा मागणीसाठी श्रीरामपूर शहरासह ग्रामीण भागात कडकडीत बंद...

 श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- नुकतेच शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली .त्यामुळे पुन्हा श्रीरामपूरकरांच्या भावना तीव्र होत श्रीरामपूर जिल्हा व्हावा ही मागणी जोर धरू लागली. श्रीरामपूर जिल्हा मागणीसाठी आज १७ जून रोजी शनिवारी समस्त श्रीरामपूरकरांच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. श्रीरामपूर शहरातील मेन रोड, छत्रपती शिवाजी महाराज रोड, नेवासा रोड, संगमनेर रोड, बेलापूर रोड, गोंधवणी रोड यासह सर्वच ठिकाणी कडकडीत बंद श्रीरामपूरकरांनी ठेवला आहे. 

       तसेच तालुक्यातील बेलापूर, टाकळीभान, भोकर यांसह अनेक गावे बंदमध्ये सहभागी होऊन कडकडीत बंद ठेवला आहे. श्रीरामपूर शहरात सर्वच छोट्या-मोठ्या व्यवसायिकांनी आपापली दुकाने बंद ठेवून बंद मध्ये सहभाग घेतला असला तरी शहरातील रस्त्यांवर अनेक श्रीरामपूरकर श्रीरामपूर जिल्हा व्हावा याविषयी चर्चा करताना दिसत आहे.

         “शिवप्रहार प्रतिष्ठान”या शिवछत्रपतींच्या अठरापगड जातीच्या शिवहिंदुत्वाच्या विचारांचा पुरस्कार करणार्या संघटनेचा श्रीरामपूर बंदला पूर्णत: पाठिंबा दिलेला आहे.