शिवप्रहार न्यूज - बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेळी गंभीर जखमी…

शिवप्रहार न्यूज - बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेळी गंभीर जखमी…

बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेळी गंभीर जखमी…

संगमनेर-सोमवार दि. २०/२/२०२३ रोजी पहाटे ३.०० वाजता ओझर बंधारा येथे श्री विजय उत्तमराव पेटारे यांच्या वस्तीवर बिबट्याने शेळीवर हल्ला केला असून सदर शेळी गंभीर जखमी झालेली आहे. सदर घटनेची माहिती वनाधिकारी श्री पुंड व वैद्यकीय अधिकारी श्री थोरात यांना कळवण्यात आलेली आहे.ओझर बंधारा परिसरामध्ये अनेक दिवसापासून बिबट्यांचा धुमाकूळ चालू आहे.   

  

       सदरच्या बिबट्याच्या वावरामुळे बंधारेवस्तीवरील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तरी सदर बिबट्यांचा वनविभागाने त्वरित बंदोबस्त कराव. अशी येथील रहिवासी नागरिकांची मागणी आहे.