शिवप्रहार न्युज - "अंतरावली सराटी लाठीहल्ला" प्रकरणी श्रीरामपूर शहरासह तालुक्यात कडकडीत बंद यशस्वी...

शिवप्रहार न्युज - "अंतरावली सराटी लाठीहल्ला" प्रकरणी श्रीरामपूर शहरासह तालुक्यात कडकडीत बंद यशस्वी...

"अंतरावली सराटी लाठीहल्ला" प्रकरणी श्रीरामपूर शहरासह तालुक्यात कडकडीत बंद यशस्वी...

श्रीरामपूर- जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यामधील अंतरावली सराटी येथे मराठा आरक्षण व इतर मुद्द्यांसाठी चालू असलेल्या उपोषण -आंदोलनावर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ आज रविवार दि.०३ सप्टेंबर रोजी श्रीरामपूर शहरासह तालुक्यात सकल मराठा समाजाच्या वतीने बंद पुकारण्यात आला होता.या बंदला अतिशय जोरदार प्रतिसाद व्यापारी व व्यावसायिक बांधवांनी दिला.

        श्रीरामपूर शहरातील मेनरोड,छ.शिवाजी महाराज रोड, नेवासारोड ,संगमनेर रोड ,गोंधवणी रोड,बेलापूर रोड सह अनेक भागात व्यापारी व व्यावसायिक बांधवांनी बंदमध्ये सहभाग घेतला.तालुक्यामध्ये माळवाडगाव(भवानी वडगाव),मुठे वडगाव ,माळेवाडी ,शिरसगाव, टाकळीभान, कारेगाव, दिघी, भोकर, अशोक नगर ,भेर्डापूर, मालुंजा ,गोंडेगाव ब्राह्मणगाव वेताळ ,उक्कलगाव ,

पढेगाव, सह पुणतांबा, वाकडी या भागात देखील आणि जिल्हयात इतरही गावात बंद पाळण्यात आला.गणपती बाप्पाची चतुर्थी असल्यामुळे खंडाळा गावात आज बंद पाळण्यात आला नाही.परंतु उद्या खंडाळा गाव बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच बेलापूर गाव देखील उद्या बंद राहणार आहे अशी माहिती मिळाली.

       बंद यशस्वी केल्याबद्दल व्यापारी व व्यावसायिक बांधवांचे सकल मराठा समाजाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले तसेच नगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल,दुग्धविकास मंत्री नामदार श्री.राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देण्यात आले.

       विविध संघटना व पक्षांसह शिवछत्रपतींच्या अठरापगड शिवहिंदुत्व विचारांवर कृती करणाऱ्या” शिवप्रहार प्रतिष्ठान” संघटनेचा ह्या श्रीरामपूर बंदला जाहीर पाठिंबा होता.