शिवप्रहार न्युज - हरेगाव मारहाण प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक करा अन्यथा ११ सप्टेंबरला भीमशक्ती संघटनेचेवतीने उपोषण करणार…

शिवप्रहार न्युज -  हरेगाव मारहाण प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक करा अन्यथा ११ सप्टेंबरला भीमशक्ती संघटनेचेवतीने उपोषण करणार…

हरेगाव मारहाण प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक करा अन्यथा ११ सप्टेंबरला भीमशक्ती संघटनेचेवतीने उपोषण करणार…

हरेगाव -येथील दलित समाजातील चार मुलांना अमानुषपणे मारहाण करणाऱ्या त्यातील प्रमुख सूत्रधार नाना गलांडे याला अटक करा अन्यथा 11 सप्टेंबरला गांधी पुतळ्यासमोर भीमशक्ती संघटना व समाजाला घेऊन उपोषण करू असे इशारा वजा निवेदन भीमशक्ती जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांनी श्रीरामपूर येथील डी.वाय.एस.पी.डॉ.बसवराज शिवपुजे यांना दिले.

     यावेळी निवेदन देताना म्हणाले की,महाराष्ट्राला काळीमा फासणारी असे घटना नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यामध्ये हरेगाव येथे घडली आहे .कबूतर चोरण्याच्या आरोपावरून चार दलित समाजातील मुलांना अक्षरशः लटकवण्यात आले व त्यांना मारहाण करण्यात आली व त्यांच्या अंगावर लघु शंका करण्यात आली व त्यांना बुटावर थुकलेलं चाटविण्यात आले असा प्रकार त्यांच्याबरोबर त्या सर्व आरोपींनी केला असा प्रकार नगर जिल्ह्यामध्ये घडला असून त्या सर्व आरोपींना अटक करा या मागणीसाठी भीमशक्ती संघटनेने रस्ता रोको आंदोलन केले. तसेच भीमशक्ती संघटनेचे संस्थापक माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी सुद्धा पीडित कुटुंबाला भेट दिली होती. 

       सर्व समाजातील नेत्यांनी भेट दिली व आपण सर्व समाजाला व सर्व संघटनेला आश्वासन दिले होते की आम्ही लवकरात लवकर आरोपी अटक करू त्याच्यातले सर्व आरोपी अटक झाले असून प्रमुख सूत्रधार नाना गलांडे याला का बर अटक करत नाही ?पोलीस का मेहरबान आहे ?गलांडेवर असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला व समाजाला पडला आहे.

     या घटनेला पंधरा ते वीस दिवस होऊन गेले आहे.तरी याच्यातील मेन सूत्रधार आरोपी मोकाट फिरत आहे त्याला लवकराच अटक करा अन्यथा आम्ही 11 सप्टेंबर रोजी गांधी पुतळा समोर भीमशक्ती संघटना व समाजातील लोकांना बरोबर घेऊन उपोषण करणार आहोत याची आपण नोंद घ्यावी असे नमुद केले.

        यावेळी जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब शिंदे ,शहराध्यक्ष अंबादास निकाळजे ,उपशहर अध्यक्ष अरुण खंडीझोड, महिला जिल्हा उपाध्यक्ष विजया बारसे ,महिला तालुकाध्यक्ष कल्पना तेलोरे ,शहराध्यक्ष वंदनाताई गायकवाड ,शेअर्स संपर्क प्रमुख गौरव बागुल ,कामरान शेख ,विठ्ठल गालफाडे ऋषिकेश जाधव ,अमन सय्यद ,चंद्रकांत येवले ,अमोल गायकवाड ,नितीन त्रिभुवन ,प्रशांत भोसले ,विश्वनाथ नरवडे ,अल्ताफ पठाण ,आकाश जाधव ,विकी शिंगारे आदित्य जगताप ,तुषार जाधव, आकाश तेलतुंबडे ,एडवोकेट अजय साळवे ,मीना पाऊलबुद्धे ,कुणाल जाधव सचिन कोतकर ,कुणाल वाहुळ हे उपस्थित होते.