शिवप्रहार न्युज - गौरी गणपतीसाठी 'आनंदाचा शिधा' मिळणार असल्याने हिंदू एकता आंदोलन पक्षाकडून स्वागत

शिवप्रहार न्युज -  गौरी गणपतीसाठी 'आनंदाचा शिधा' मिळणार असल्याने हिंदू एकता आंदोलन पक्षाकडून स्वागत

गौरी गणपतीसाठी 'आनंदाचा शिधा' मिळणार असल्याने हिंदू एकता आंदोलन पक्षाकडून स्वागत

   श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- सरकारने गौरी गणपतीनिमित्त आनंदाचा शिधा देण्याची घोषणा केल्याने हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या वतीने स्वागत करण्यात आले. हा आनंदाचा शिधा सरकारने अन्न सुरक्षा कार्डधारकांसाठी देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. यामुळे लोकांचा गौरीगणपती सण गोड होणार आहे.

   जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून हेमा बढे व उपजिल्हा पुरवठा अधिकारी किशोर कदम व जिल्ह्यातील सर्व तहसीलदार यांनी शासनाकडे पाठपुरावा केल्याने सदर १०० रुपयात देण्यात येणारा आनंदाचा शिधा शासकीय गोदामामध्ये आला आहे. हा गौरीगणपतीच्या अगोदर कार्डधारकांना दिला जाणार असल्याचे हेमा बढे यांनी सांगितले आहे.

   शासनाच्या या निर्णयाचे प्रदेशाध्यक्ष सुदर्शन आण्णा शितोळे, शहराध्यक्ष मंगेश छतवाणी, प्रदेश संघटक विजय जगताप, जिल्हा कार्याध्यक्ष चिलिया तुवर, जिल्हा संघटक मुकुंद लोळगे, गोरक्ष भुसाळ, शेतकरी महाआघाडीप्रमुख जी.एम.क्षीरसागर, राहुरी तालुकाध्यक्ष प्रसाद गाढे, जिल्हा सरचिटणीस वसंत गायकवाड, जिल्हा संघटक सोपानराव पागिरे, शिवाजी फोफसे, अविनाश कनगरे, कोपरगाव तालुकाध्यक्ष राजेंद्र जाधव, राहाता संघटक, दत्तात्रय मंडलिक, राहाता तालुकाध्यक्ष रामदास सदाफळ, राहाता शहराध्यक्ष जयराम क्षीरसागर, गुरू भुसाळ, सोमनाथ जगताप, जिल्हा संपर्कप्रमुख सुभाष यादव, बाळासाहेब जाधव, राजेंद्र पारधे आदींनी स्वागत केले आहे.