शिवप्रहार न्युज - 'क्लासची फी घेणार नाही' म्हणत विद्यार्थीनीचा विनयभंग! दुसऱ्या घटनेत विवाहितेला शेतात उचलून नेऊन...!!
'क्लासची फी घेणार नाही' म्हणत विद्यार्थीनीचा विनयभंग! दुसऱ्या घटनेत विवाहितेला शेतात उचलून नेऊन...!!
नेवासा /संगमनेर (शिवप्रहार न्यूज)- तुझ्या क्लासची फी घेणार नाही असे म्हणत विद्यार्थिनीचा भर दिवसा विनयभंग करण्याचा प्रकार नेवासा तालुक्यातील देडगाव परिसरात घडल्याने पालकांसह विद्यार्थिनींमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
नेवासा तालुक्यातील एक अल्पवयीन विद्यार्थिनी क्लासला गेली असता तिला आरोपी जोशफ सत्यदान हिवाळे राहणार-देडगाव यांने सदर विद्यार्थिनीला तुझ्या वडिलांकडे माझे काम आहे, तुला मी घरी सोडतो असे म्हणून दुचाकी वर बसवून शनी मंदिराच्या भागात नेऊन तिला स्पर्श करुन लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून विनयभंग केला. तसेच 'तु क्लास ची फी देवू नको' असेही हिवाळे विद्यार्थिनीला म्हणाला. भर दिवसा सकाळी हा प्रकार घडला. पिडीत विद्यार्थिनीच्या वडिलांनी याप्रकरणी नेवासा पोलिसांत फिर्याद दिल्यावरून आरोपी जोसेफ हिवाळे याच्याविरुद्ध विनयभंग व पोस्को कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपी हिवाळेचा पोनि.डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.बडे हे शोध घेत आहे.
दुसऱ्या घटनेत संगमनेर तालुक्यातील एक 35 वर्षाची विवाहित तरुणी घरामागे लघुशंका करण्यासाठी गेली असता आरोपी बाळासाहेब उर्फ बाळूभाऊ नामदेव माळी राहणार-मांची फाटा, संगमनेर याने महिलेला उचलून बाजरीच्या शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिलेने आरडाओरडा केल्याने आरोपी धमकी देवून पळाला. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीसांत पिडीत विवाहित महिलेने फिर्याद दिल्यावरुन आरोपी बाळासाहेब उर्फ बाळू माळी याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोनि.ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई.वाघ हे करत असून आरोपीचा कसून शोध सुरू आहे.