शिवप्रहार न्युज - श्रीरामपूर शहरातील मंदिराच्या कळसाची चोरी…
श्रीरामपूर शहरातील मंदिराच्या कळसाची चोरी…
श्रीरामपूर -श्रीरामपूर शहरातील गोंधवणी रोड परिसरातील वार्ड नंबर ०१ मधील झिरंगेनगर येथील जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या मंदिरावरील कळसाची काल रात्री चोरी झाल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी आज १२ ऑक्टोबर २०२३ रोजी चंद्रकांत विठ्ठल झिरंगे यांनी पोलिसात लेखी तक्रार अर्ज दिला आहे.याप्रकरणी पोलिसांकडून कारवाई चालू असल्याची माहिती मिळते.पोलीसांनी लवकरात लवकर आरोपी पकडावे अशी मागणी हिंदू बांधव करत आहे.
श्रीरामपूर शहरात मोठ्या प्रमाणात छोट्या-मोठ्या चोऱ्या होत असतात.तसेच गंठण चोरीच्या घटना देखील अनेक घडतात.त्यातच शहरातील मंदिराच्या कळसाची चोरी झाल्याने मंदिर सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.