शिवप्रहार न्युज - दारू पिऊन आलेल्या नवऱ्याचा बायकोकडून खून; श्रीरामपुरातील प्रकार...

शिवप्रहार न्युज -  दारू पिऊन आलेल्या नवऱ्याचा बायकोकडून खून; श्रीरामपुरातील प्रकार...

दारू पिऊन आलेल्या नवऱ्याचा बायकोकडून खून; श्रीरामपुरातील प्रकार...

   श्रीरामपूर (शिवप्रहार न्यूज)- 31 डिसेंबरला रात्री दारू पिऊन येऊन बायकोकडे शरीरसुखाची मागणी करून तिला त्रास देणाऱ्या नवऱ्याला चिडलेल्या बायकोने डोक्यात रॉड मारून खून केल्याची घटना पोलीस तपासत उघड झाली आहे.

    श्रीरामपूर शहरातील अतिथी कॉलनी परिसरात राहणारा संजय भोसले हा 31 डिसेंबरला रात्री पावणे बारा वाजता दारू पिऊन घरी आला होता. त्यानंतर त्याने पत्नी संगीता हिच्याशी शरीर सुखाची मागणी केली तेव्हा संगीता ने नकार दिल्याने त्यांच्यात भांडण झाले आणि संगीता हिने संजयच्या डोक्यात रॉड मारून खून केला. सुरुवातीला संजय भोसले यांचा मृत्यू पाय घसरून पडल्याने झाल्याचे सांगितले जात होते. परंतु पोलीस तपासात पत्नीनेच खून केल्याचे उघड झाले आहे. 

   याप्रकरणी संजय भोसले यांचा पुतण्या मयूर भोसले यांनी श्रीरामपूर शहर पोलिसात दिल्यावरून संजय भोसले यांची पत्नी संगीता भोसले हिच्याविरुद्ध कुणाचं गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास डीवायएसपी बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गवळी करत आहेत.