शिवप्रहार न्युज - पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रात नाटकाद्वारे झालेल्या प्रभु श्रीरामांच्या अवहेलनेचा श्रीरामपूर निषेध...

शिवप्रहार न्युज - पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रात नाटकाद्वारे झालेल्या प्रभु श्रीरामांच्या अवहेलनेचा श्रीरामपूर निषेध...

पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रात नाटकाद्वारे झालेल्या प्रभु श्रीरामांच्या अवहेलनेचा श्रीरामपूर निषेध...

श्रीरामपूर-

सावित्रीमाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राने आयोजित केलेल्या राम लीला या नाटकाच्या माध्यमातून प्रभू श्री राम, माता सीता आणि लक्ष्मण या देवी देवतांचा अपमान करण्यात आला. सर्व प्रकरण थांबवण्यासाठी पुढे सरसावलेल्या विद्यापीठातील विदयार्थ्यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली.या नाटकात सीता माता बिडी ओढताना दर्शवले आहे,माता सीता आणि लक्ष्मण यांचे अनैतिक संबंध असल्याचे दाखवले आहे.एवढंच नव्हे तर सीता माता गलिच्छ शब्दात शिवीगाळ करताना त्यात दाखवलेले आहे.सदर नाटीकेची तयारी ही विद्यापीठाच्या ललित कला केंद्रात गेल्या सहा महिन्यांपासून चालु होती तरी देखील संबंधित विभाग प्रमुख भोळे तसेच विद्यापीठ प्रशासनाने कुठलीही कारवाई केली नाही.

       गेल्या अनेक वर्षांपासून या कला क्षेत्राच्या माध्यमातून फक्त हिंदू धर्मालाच टार्गेट करण्याचा काम अनेक डाव्या विचारांचे लोक करत आहे.त्यामुळे अभाविप हे सहन करणार नाही.या नाटकाच्या माध्यमातन सकल हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत तरी संबधित ललित कला केंद्र प्रमुख भोळे नाटकाचे दिग्दर्शक,लेखक व अभाविप च्या कार्यकर्त्यांना ज्यांनी मारहाण केली अशा सर्वांवर कठोर कारवाई व त्यांचे निलंबन व्हावे अशी अभाविप मागणी करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद श्रीरामपूर शाखेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.

         यावेळी संबंधित भोळे, नाटकाचे दिग्दर्शक,लेखक ज्या विद्यार्थ्यांनी मारहाण केली अशा सर्वांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी अभाविप चे प्रथमेश जोशी ,प्रतिक लगे,शहर मंत्री वैष्णव भारोडकर,शहर सहमंत्री ऋषिकेश खैरे,शहर का.प्र.ओम कायगुडे, महाविद्यालय अध्यक्ष आदित्य व्हसाळे,शुभम देवकाते, निलेश गायकवाड, आदित्य भागवत, हिंदू जनजागृती समितीचे विशाल गाडेकर, अभिजीत गोरे, कार्तिक काळे, आदित्य रोकडे,चेतन जोगी, ओंकार हरडे,हर्ष रसाळ,शुभम थोरात, प्रविण बोधक,सचिन मिळाली,प्रणव एलम, अभिषेक फुणगे आदींनी उपस्थित राहुन केली.