शिवप्रहार न्युज - श्रीरामपूर जिल्हा मागणीतील मोठे यश;उत्तर नगरसाठी 'सहायक संचालक नगररचना' कार्यालय श्रीरामपुरात…
श्रीरामपूर जिल्हा मागणीतील मोठे यश;उत्तर नगरसाठी 'सहायक संचालक नगररचना' कार्यालय श्रीरामपुरात…
श्रीरामपूर(शिवप्रहार न्युज)- श्रीरामपूर जिल्हा कृती समिती व शिवप्रहार प्रतिष्ठानच्या वतीने चालू असलेल्या "श्रीरामपूर जिल्हा"मागणी मध्ये एक महत्वाचे यश हाती आले आहे.शेतजमीनी ,जागा, भुखंड तसेच त्यावर प्लॅनिंग लेआऊट यांची सर्व कामे तीही संपूर्ण उत्तर नगर जिल्ह्याची आता श्रीरामपूरात होणार आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीरामपूर येथील लवाद नगररचना योजना कार्यालयाचे 'सहायक संचालक नगररचना शाखा असे नामकरण करण्यात आले आहे. त्यासाठी पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यात आला आहे. राज्याच्या नगर विकास विभागाने काल २० फेब्रुवारी मंगळवार रोजी त्यासंबंधीचे आदेश पारित करत उत्तर नगर जिल्ह्यातील श्रीरामपूरसह संगमनेर, कोपरगाव, राहाता, राहुरी, नेवासा व अकोले हे तालुके त्यास जोडले आहे. या सर्व तालुक्यांतील नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती तसेच महसूल नगररचनाविषयक विभागांकडील कामकाज श्रीरामपुरातील सहायक संचालक कार्यालयाकडून करता येणार आहेत.
त्यामुळे उत्तर नगर जिल्ह्याच्या भागातील नागरिकांची घरांच्या बांधकाम परवानगी व बिगरशेतीच्या कामांसाठी नगर येथे जाण्याची आवश्यकता नसून श्रीरामपूरलाच ही कामे होणार आहेत.
श्रीरामपूर जिल्हा कृती समिती आणि शिवप्रहार प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या ०५ महिन्यांपासून श्रीरामपूर जिल्हा व्हावा या मागणी करता बिगरराजकीय लोकचळवळ चालू आहे.छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवस्मारकासह सरकारने श्रीरामपूर जिल्हा घोषित करावा हे या लोकचळवळीचे अंतिम ध्येय आहे. या आंदोलनाला हे एक मोठे यश ०७ तालुक्याचे नगररचना कार्यालय श्रीरामपूरला आल्यामुळे मिळाले आहे. पुढेही कृती समिती व “शिवप्रहार”चा लढा चालूच राहणार आहे.