शिवप्रहार न्युज - श्रीरामपूर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ सुरूच वळदगावात ०२ कुत्र्यांची शिकार;वनविभाग माणसांची शिकार होण्याची वाट पाहतंय का ?
श्रीरामपूर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ सुरूच वळदगावात ०२ कुत्र्यांची शिकार;वनविभाग माणसांची शिकार होण्याची वाट पाहतंय का ?
श्रीरामपूर- (शिवप्रहार न्युज )श्रीरामपूर तालुक्यातील विविध गावांमध्ये बिबट्याने धुमाकूळ घातल्याच्या बातम्या वारंवार समोर येत आहेत.त्यामध्ये नुकतेच वळद-उंबरगाव शिवारातील श्री.शिवरकर यांच्या मळ्यामध्ये बिबट्याने ०२ कुत्र्यांची शिकार केल्याची घटना परवा रात्री घडली आहे.हि घटना शेतकरी श्री. विजय शिवरकर यांच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे.
सीसीटीव्ही कॅमेरामध्ये शोध घेतल्यावर दिसले की,हा बिबट्या शेजारीच असलेल्या ज्येष्ठ पत्रकार,दै.जय बाबाचे कार्यकारी संपादक श्री.मनोजकुमार आगे यांच्या शिवशंकर मळ्यातील उसाच्या शेतातुन बाहेर येऊन श्री.शिवरकर यांच्या शेतातील शेडजवळ असलेल्या कुत्र्यावर हल्ला करून त्याला घेऊन परत उसात जात आहे व ह्या बिबट्याच्या भीतीने इतर कुत्रे सैरावैरा पळत आहेत.या बिबट्याने परवा ०२ कुत्रे आणि आत्तापर्यंत अनेक कुत्र्यांचा,पिल्लांचा,मोर-लांडोरांचा बळी घेतला असून तो माणसांवर हल्ला करण्याची शक्यता अजिबात नाकारता येणार नाही. या परिसरात राहणाऱ्या ग्रामस्थांमध्ये त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तरी वनविभागाने लोणीसारखी बिबट्या नरभक्षक होण्याची घटना घडेपर्यंत,माणसाची शिकार बिबट्याकरेपर्यंत वाट न पाहता या परिसरात तात्काळ पिंजरा लावावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.