शिवप्रहार न्युज - गाड्या चोरणारी टोळी पकडली; श्रीरामपूरचा भाचा मालेगावच्या मामाच्या मदतीने करायचा विक्री...

शिवप्रहार न्युज -  गाड्या चोरणारी टोळी पकडली; श्रीरामपूरचा भाचा मालेगावच्या मामाच्या मदतीने करायचा विक्री...

गाड्या चोरणारी टोळी पकडली; श्रीरामपूरचा भाचा मालेगावच्या मामाच्या मदतीने करायचा विक्री...

   श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- श्रीरामपूर शहर पोलिसांनी मोटारसायकल चोरून त्यांची विक्री करणारी टोळी जेरबंद केली असून

त्यांच्याकडून तब्बल १६ लाख रूपयांच्या १८ मोटारसायकली पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. विशेष म्हणजे मोटारसायकल चोरी करणारे सर्व चोर हे श्रीरामपुरातीलच आहेत आणि यातील एक जण हा मालेगाव येथील आपल्या मामाच्या मदतीने या मोटारसायकली विकायचा, हेही पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. श्रीरामपूर परिसरात सतत मोटारसायकल चोऱ्या होत असताना पोलिसांनी तपास लावून मोटारसायकल चोर पकडल्याने पोलिसांना धन्यवाद देण्यात येत आहे.

    श्रीरामपूर शहर आणि परिसरात तसेच नगर जिल्हयात ठिकठिकाणांहून मोटारसायकल चोरीच्या घटना नेहमी घडत असल्याचे पुढे येते. खंडाळा येथील शेतकरी अमोल बोरकर यांची १२ जानेवारीला मोटारसायकल चोरीला गेली होती. त्याचा तपास शहर पोलीस करीत होते. सदर तपास करताना ऋषिकेश जाधव, रा. सूतगिरणी फाटा याचे संशयित म्हणून नाव पुढे आले. मात्र, हा आरोपी सतत ठावठिकाणा बदलत असल्याने पोलिसांना लवकर तो हाती लागेना. पोलिसांनी सापळा लावून आरोपी ऋषिकेश कैलास जाधव याचा पाठलाग करून त्याला पकडले. तेव्हा त्याने दिलीप मोहन आढाव, वय-५२, रा.आगाशेनगर, दत्तनगर, श्रीरामपूर, किरण संतोष मोरे, वय-१९, रा. सूतगिरणी, रमानगर, श्रीरामपूर यांच्या मदतीने चोरी केल्याचे कबूल केले. त्यांच्याकडून १८ हजार रूपयांचे ३०० किलो अद्रक, ७० हजार रूपयांची हिरो कंपनीची मोटारसायकल, १० हजार रूपये किंमतीची पानबुडी मोटार असा ९८ हजारांचा माल हस्तगत केला. 

   सदर आरोपींकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांनतर पोलिसांनी अधिक विश्वासात घेवून त्यांच्याकडे चौकशी केली असता श्रीरामपूरसह नगर शहर व इतर ठिकाणच्या मोटारसायकली आणि मोपेड गाड्या चोरल्याची त्यांनी कबूली दिली आणि या चोरीत आपल्याबरोबर दानिश महंमद सय्यद, रा.इदगाह मैदान, वॉर्ड.नं.२, श्रीरामपूर, गौरव बागूल, रा.रमानगर, दत्तनगर, श्रीरामपूर, संदीप सुडगे, रा. रमानगर, दत्तनगर, श्रीरामपूर अशांनी मिळून या चोऱ्या केल्याची कबूली दिली. यातील आरोपी दानिश हा पोलिसांना सापडत नव्हता. तो मालेगावात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शिताफीने शोध घेत त्याला मालेगाव येथे पकडले. तेव्हा त्याने सांगितले की, सदर चोरीच्या मोटारसायकली आपण मामा रियाज हुसनउद्दीन शेख, रा. छोटा कब्रस्थानजवळ, आझादनगर, मालेगाव याच्यामार्फत विक्री करण्यासाठी मालेगावला आल्याची कबूली दिली. पोलिसांनी त्याच्या मामाच्या राहत्या घरून ११ मोटारसायकली जप्त केल्या.

     वेगवेगळ्या गुन्हयातील मोटारसायकली आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी जप्त केल्या. त्यात संभाजी आप्पासाहेब फरगडे, रा. गोंधवणी, ता. श्रीरामपूर, अभिषेक लक्ष्मण वाघ, रा. पाथर्डी, योगेश बाळासाहेब गायकवाड, रा.वा.नं.७, श्रीरामपूर, सुहास भाऊराव चव्हाण (पीआय), रा. आंबेजोगाई, जुनारोड लातूर, लक्ष्मण साधू साळवे, रा. देडगाव, ता. नेवासा, शामल सदाशिव झावरे, रा. वडगावगुप्ता, नगर, प्रकाश रूपा जाधव, रा. ढवळपूरी, नगर, आदिक रावसाहेब चांदे, रा. फत्याबाद, ता. श्रीरामपूर, अली सागर साबीर बोहरी, रा. बागलान, नाशिक, बंडप्पा शिवरूद्रप्पा कुर्ल, रा. तपोवनरोड, नगर, कुलदीप गवराम म्हस्के, रा.दत्तनगर, ता. श्रीरामपूर, सुहास सुनील भोसले, रा. पाथरे, ता. राहाता, अभिजीत बबन गाडे, रा.बीड, लक्ष्मीकांत गणपत माने, रा. गोटूंबे आखाडा, राहुरी, ओमकार नामदेव भालसिंग, खराडी बायपास, पुणे, मोहीत मोहनदास लुल्ला, रा.इष्ट कल्याण, ठाणे आदींच्या चोरीला गेलेल्या मोटारसायकली या सापडल्या आहेत.

   पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, डिवायएसपी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. नितीन देशमुख यांच्या तपास पथकातील पोउनि. समाधान सोळंके, परि.पोलीस उपनिरीक्षक दिपक मेढे, पाहेकॉ.शफिक शेख, पोहे कॉ. आलम पटेल, पोना. रघुवीर पोना. किशोर पोकॉ. राहुल पोकॉ. गौतम कारखेले, औताडे, नरवडे, लगड, पोकॉ. रमीजराजा अत्तार, पोकॉ. संभाजी पोकॉ. अजित पोकॉ. धनंजय खरात, पटारे, वाघमारे, पोकॉ. अंबादास आंधळे, पोकॉ. कैलास पोकॉ. अमोल पोकॉ. पांडुरंग पोकॉ. कुलदीप झिने, पडोळे, चौधरी, पर्वत, पोकॉ. आकाश वाघमारे, म. पोकॉ. विराज सरद तसेच अपर अधीक्षक कार्यालयाचे पोना. संतोष दरेकर, पोना. सचिन धनाड, पोना. वेताळ यांच्यासह नाशिक, मालेगाव येथील पोलिसांनी या तपासकामी मोलाची कामगिरी बजावली आहे.