शिवप्रहार न्युज - इंदिरानगरमधील श्री.तुळजाभवानी माता मंदिरात चोरी करणारे चोरटे CCTV मध्ये कैद…

शिवप्रहार न्युज -  इंदिरानगरमधील श्री.तुळजाभवानी माता मंदिरात चोरी करणारे चोरटे CCTV मध्ये कैद…

इंदिरानगरमधील श्री.तुळजाभवानी माता मंदिरात चोरी करणारे चोरटे CCTV मध्ये कैद…

श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- श्रीरामपूर शहराजवळ असलेल्या शिरसगाव हद्दीतील इंदिरानगर येथील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री.तुळजाभवानी माता मंदिरात काल बुधवारी पहाटे २.३० वाजेच्या सुमारास चोरट्यांनी मंदिराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून मंदिरात असलेली दानपेटी काढली व मंदिराचे बाहेर येऊन फोडून अंदाजे रोख रक्कम रु. १० हजाराचे आसपास चोरून नेली. ७/८ दिवसापासून दानपेटीतील रक्कम काढण्यात आली नव्हती असे समजते. चोरी करताना बरीच कुत्रे भुंकत होते परंतु असे घडेल अशी कोणाला कल्पना नव्हती. 

       देवीच्या मंदिरातील सीसीटीव्हीत सदर चोरीची घटना कैद झाली असून तोंडाला शर्ट बांधून बनियनवर एक चोरटा मंदिरामध्ये घुसून दानपेटी दरवाजातून बाहेर उभ्या असलेल्या दुसऱ्या चोरटयाच्या हातात देताना दिसत आहे. नुकतेच या श्रीतुळजाभवानी मंदिराचा वर्धापन दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. देवी भवानीच्या मंदिरात परिसरातील भाविक मोठया संख्येने येत असतात. मंदिरात चोरी झाल्याने तुळजाभवानी भक्तांनी संताप व्यक्त केला आहे.