शिवप्रहार न्युज - श्रीरामपुरातील अल्पवयीन मैत्रिणीचा स्नॅपचॅटवर “प्रायव्हेट” व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यावर गुन्हा दाखल…

शिवप्रहार न्युज -  श्रीरामपुरातील अल्पवयीन मैत्रिणीचा स्नॅपचॅटवर “प्रायव्हेट” व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यावर गुन्हा दाखल…

श्रीरामपुरातील अल्पवयीन मैत्रिणीचा स्नॅपचॅटवर “प्रायव्हेट” व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यावर गुन्हा दाखल…

श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- श्रीरामपूर शहरातील अल्पवयीन मुलीचा “प्रायव्हेट”/अर्धनग्न व्हिडिओ मुलीच्याच अल्पवयीन मित्राने सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

     याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीरामपूर शहरात राहणारी अल्पवयीन मुलगी आणि तिचा अल्पवयीन मित्र या दोघांनी सोशल मीडियावरील स्नॅपचॅट या ॲपमध्ये अकाउंट उघडले होते. या अकाउंटच्या गॅलरीमध्ये सदर अल्पवयीन मुलीचा अर्धनग्न व्हिडिओ सेव्ह केला होता. हा व्हिडिओ मुलीच्या अल्पवयीन मित्राने सोशल मीडियाच्या माध्यमातून दुसऱ्यांना पाठवून अल्पवयीन मुलीसह तिच्या नातेवाईकांची बदनामी केली.

     याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने सायबर पोलिसांत फिर्याद दिल्यावरून व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या अल्पवयीन मुलाविरुद्ध भादंवी कलम ५०० सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नगर सायबर पोलिस करत आहे.